Sangli Accident : नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
Sagli Accident : सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय.

Sangli Accident : सांगलीतील (Sangli) कडेगाव तालुक्यातील वांगी येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव मधील दाम्पत्याचा मृत्यू झालाय. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते अशी त्यांची नावे आहेत. दोघेही वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून वांगीकडे परतत असणाऱ्या कारने त्यांना समोरून धडक दिली. दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघातामध्ये (Sangli Accident News) दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव येथील विकास भिकू मोहिते हे मोटारीतून ताकारी (ता. वाळवा) येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते. गुरुवारी रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून ते पत्नी पुष्पा आणि इतर नातेवाईकांसह वांगी कडेपूरमार्गे खटाव येथे परतत होते. याचवेळी जमीर ईलाही आवटी (रा. महाबळेश्वर, जि. सातारा) हा प्रवासी मोटार घेऊन महाबळेश्वरहून कडेपूर-वांगीमार्गे सांगलीच्या दिशेने निघाला होता.
मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू
वांगी येथील वाल्मिकनगर परिसरात ताकारी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ जमीर आवटीच्या मोटारीने समोरून येणाऱ्या विकास मोहिते यांच्या मोटारीस जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही मोटारींच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला झाला. या भीषण अपघातात मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
पाच जण जखमी
तर त्यांच्या मोटारीतील ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहित तोरसे, आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी मोटारीचा चालक जमीर आवटी हा देखील जखमी आहे. जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत ऋतुजा रोहित तोरसे (रा. खटाव) यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

