Karnataka HC : आधी शरीरसंबंध मग बलात्काराचा आरोप, कोर्टानं आरोप करणाऱ्या महिलेला झापलं
अनेक वर्षं सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यावर बलात्काराचा आरोप करता येणार नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयने स्पष्ट केलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महिलेचे आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर २०१३ ते डिसेंबर २०१९ पर्यंत त्यांच्यात जवळपास सहा वर्षे त्यांचे संबंध होते. पुढे २७ डिसेंबर २०१९ पासून त्यांच्या बेबनाव निर्माण झाला. आणि ८ मार्च २०२१ रोजी या महिलेने त्या व्यक्तिविरोधात बेंगळुरूच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याचे आणि धमकीचे आरोप केल्याची तक्रार केली. नंतरआरोपीला जामीन मिळाल्यानंतर या महिलेनं त्याच्यावर मारहाण आणि बलात्काराचा आरोप केला. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने बेंगळुरूच्या इंदिरानगर तसंच दावणगेरे येथे आरोपीविरोधातील सर्व तक्रारी रद्द करण्याचे आदेश दिले. आणि दोघांमध्ये सहा वर्षांपर्यंत लैंगिक संबंध असल्यामुळे बलात्काराचा आरोप करता येणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.