Andheri Landslide Spots Special Report : मुंबईतील अंधेरीत दरड कोसळली, आणखी किती इर्शाळवाड्या?
Andheri Landslide Spots Special Report : मुंबईतील अंधेरीत दरड कोसळली, आणखी किती इर्शाळवाड्या?
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीची दरड दुर्घटना ताजी असतानाच, मुंबईतल्या अंधेरी पूर्वच्या येथील चकाला परिसरात आज दरड कोसळली. ही दुर्घटना मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत रामबाग सोसायटीच्या शेजारी असलेल्या डोंगरामधून मातीचा ढिगारा कोसळला. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की, मातीचा ढिगारा इमारतीच्या पहिला मजल्यावर असलेल्या चारपाच फ्लॅटमध्ये घुसला. या इमारतीतील रहिवाशी गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. पण सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण पाचसहा घरांचं मोठं नुकसान झालं. या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळत असल्यामुळं इमारतीतल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या दरड दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि मुंबई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलानं रहिवाशांना ही इमारत रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.