Ambadas Danve: मोहित कंबोजांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानही हलत नाही, बड्या अधिकाऱ्याशी कनेक्शन; अंबादास दानवेंचा आरोप
Ambadas Danveमोहित कंबोज ने हस्तक्षेप करण्याचे कारण काय असावाही अंबादास दानवे यांनी केला . .

Ambadas Danve: ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या जलसंपदा आणि जलसंधारण खात्यात जर एखादा अधिकाऱ्याला फोन केला तर त्यावर निर्णय मोहित कंबोज घेतात असा गंभीर आरोप अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी सरकारवर केलाय .जलसंपदा विभागातील बड्या अधिकाऱ्याशी मोहित कंबोज यांचे कनेक्शन असल्याचं सांगत या दोघांचे संभाषण सरकारने तपासावे, त्यांच्यावर सीडीआर तपासावा असंही अंबादास दानवे म्हणाले. दीपक कपूर(Deepak Kapoor) नावाचे अधिकारी मोहित कंभोजांना विचारल्याशिवाय पाणीही पीत नाहीत .मोहित कंभोजांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागाचे पानही हलत नाही .कोण आहे हा मोहित कंबोज ? असा सवाल करत मोहित कंबोज हस्तक्षेप करतातच कसा .याची चौकशी करावी अशी मागणी ही अंबादास दानवे यांनी सभागृहात केली . Ambadas danve on Mohit Kamboj)
काय म्हणाले अंबादास दानवे ?
राज्यात पाट ,चाऱ्या,दुरुस्ती असे वेगवेगळे प्रश्न असताना निर्णय मोहित कंबोज घेतात .हे सगळं पुरावा आहे म्हणूनच बोलतोय असंही अंबादास दानवे म्हणाले . यावर कोणाचे नाव घेऊन बोलू शकत नाहीत असा आक्षेप घेतल्यानंतर मोहित कंबोज तुमचा जावई आहे का असा सवाल करत अंबादास दानवे यांनी आरोपसत्र सुरूच ठेवले . सभागृहातील खालच्या वरच्या सदस्यांचे नाव घ्यायचं नाही बाहेरच्या व्यक्तीचे नाव घ्यायला बंधन नाही असेही दानवे म्हणाले .
याची चौकशी व्हावी .मी पुरावे देईन .मी पुन्हा एकदा सांगतो मोहित कंभोज राज्याचा जलसंपदा विभाग चालवतात . मोहित कंबोज आणि अधिकारी दीपक कपूर या दोघांमधील झालेले संभाषण तपासा .त्यांच्यावर सीडीआर तपासा .सरकारने यावर चौकशी करावी अशी मागणी ही अंबादास दानवे यांनी केली .कोणत्या कोणत्या कामात मोहित कंबोज ने काय केले हे सांगू का ? फार पुढे गेलो तर लफडे होतील. कुठल्या मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केलेला मी समजू शकतो .मोहित कंबोजने हस्तक्षेप करण्याचे कारण काय असावाही अंबादास दानवे यांनी केला . राज्यपालांचे भाषण ,राष्ट्रपुरुषांचा अवमान या राज्यात होतोय .महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न एक समिती नेमली त्याची बैठक परत कधीही झाली नाही .त्याच्यावर विचारणा झाली नाही .दावस मध्ये झालेले करार ही राज्याची फसवणूक आहे .प्रशासन पूर्णपणे ढेपळले आहे .लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेत लाडक्या भावाला छळला जातंय .
.























