एक्स्प्लोर

Colours Marathi Serial Track: वल्लरीचा प्रेरणाला मोलाचा सल्ला, तर स्त्री प्रबलीकरणसाठी सानिकाचा उचलणार पहिलं पाऊल; कलर्स मराठीवर महिला दिनानिमित्त विशेष भाग

Pinga Ga Pori Pinga Marathi Serial Track: पिंगा गं पोरी पिंगा आणि लय आवडतेस तू मला मालिकेचे महिला दिन विशेष भाग 8 मार्चला प्रदर्शित होणार आहेत.  

Pinga Ga Pori Pinga Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) पिंगा गं पोरी पिंगा (Pinga Ga Pori Pinga) आणि लय आवडतेस तू मला (Lai Avadtes Tu Mala) मालिकेत वल्लरी आणि सानिका उचलणार महत्वाचे पाऊल. वल्लरी देणार प्रेरणाला मोलाचा सल्ला तर कळशी गावातील स्त्री प्रबलीकरणासाठी सानिका सुरू करणार नवा आणि आगळावेगळा व्यवसाय. वल्लरीसमोर समीरचं खरं रूपं येताच ती येत्या भागामध्ये प्रेरणाला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास प्रवृत्त करताना दिसणार आहे. याचद्वारे प्रत्येक स्त्रीला एक संदेश देताना दिसणार आहे. पण प्रेरणा समीरला हे सांगू शकेल का? तिच्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात उभी राहील का? वल्लरी आणि पिंगा गर्ल्सची तिला कशी साथ मिळेल? हे बघणे रंजक असणार आहे. तर, दुसरीकडे सानिका कळशी गावातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गावकरी महिलांना तिच्या नव्या व्यवसायात सहभागी होण्यासाठी तयार करताना दिसणार आहे. तेव्हा नक्की बघा पिंगा गं पोरी पिंगा आणि लय आवडतेस तू मला मालिकेचे महिला दिन विशेष भाग 8 मार्चला पाहा. 

लय आवडतेस तू मला मालिकेत सानिकाचा संपूर्ण गावाला रोजगार मिळून देण्याचा धाडसी निर्णय घेणार असून त्याची सुरुवात महिलांपासून करणार आहे. स्त्री प्रबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल घेताना दिसणार आहे. सानिकाला गूळ उत्पादनाचा व्यवसाय करण्याची कल्पना सुचते आणि ती गावातील महिलांना सक्षम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार करते. गूळ बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये आलेल्या अडचणींवर मात करत सानिका अखेर यशस्वी होते. तिच्या या उपक्रमामुळे गावातील महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्याचा मार्ग खुला होतो. मात्र, सई आणि इतर काही जणांच्या कारस्थानांमुळे सानिकाच्या मार्गात अडथळे येत आहेत. तरीही सानिकाच्या धैर्यानं आणि सकारात्मक दृष्टिकोनानं ती या सर्व अडचणींवर मात करताना दिसत आहे. 

 सगळ्या सुपर वूमन्सला माझा सलाम : सानिका मोजार 

सानिका मोजार म्हणाली की, "एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या सगळ्या सुपर वूमन्सला माझा सलाम. माझ्यासाठी माझी आईच माझी इन्स्पिरेशन आहे. सगळ्याच स्त्रिया त्या स्वतः आधी इतरांना ठेवतात. इतरांच्या सेवेत, त्या स्वतः च्या आशा आकांक्षा बाजूला ठेवतात. त्यांचं स्वतः साठी जगणं राहून जातं. पण स्त्रियांनी स्वतःला न विसरता स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला हवा म्हणजे स्वतः त्या आणि त्यांच्या आयुष्यातील सगळेच खुश राहू शकतील. अगदी अशी मालिकेतील सानिका आहे. मालिकेत आम्ही तसंच दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे. महिलांनी स्वतः च्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे, त्यांनी स्वतःचा देखील विचार केला पाहिजे." 

पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत वल्लरीसमोर अखेर समीरचा चेहरा येणार आहे. प्रेरणा भोगत असलेला त्रास वल्लरीला कळणार आहे. समीरचा रागीट स्वभाव, प्रेरणाला तो देत असलेली वागणूक हे चुकीचं आहे आणि याची जाणीव वल्लरी प्रेरणाला करून देताना दिसणार आहे.  समान मान स्त्रीला मिळायला हवा, तिची अस्मिता खोडू नका... जशी घर सांभाळणारी गृहलक्ष्मी आपल्यात असते तशीच अन्यायाविरुध्द्व लढणारी दुर्गा देखील आपल्यात असते. वल्लरीनं दिलेल्या या मोलाच्या सल्ल्यानंतर प्रेरणा आपल्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध आवाज उठवेल का? हे मालिकेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

घर म्हणजे स्त्रियांची चौकट, हा विचार मोडून काढणारी स्त्रियांची आजची पिढी : ऐश्वर्या शेटे

ऐश्वर्या शेटे म्हणाली , स्त्री ही स्वतःचं रक्षण करायला सक्षम आहेच. पण त्याचबरोबर आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यावर मात करून यशस्वी होण्याचं सामर्थ्यसुद्धा स्त्रीकडे आहे. कधी आपल्या माणसांचा पाठिंबा लाभेल तर कधी नाही लाभणार, कधी यश येईल तर कधी हार सुद्धा अनुभवावी लागेल, पण या सगळ्यात स्त्रीची जिद्द कधी कमी होणार नाही. ही जिद्द प्रत्येक स्त्रीमध्ये असते हे आम्ही आमच्या मालिकेतून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. घर म्हणजे स्त्रियांची चौकट ह्या विचाराला मोडून काढणारी आजची पिढी आहे स्त्रियांची. घरापासून दूर राहून स्वतःच आयुष्य घडवते स्त्री, आणि घरापासून दूर राहून सुद्धा घर उत्तम सांभाळू शकते. फक्त घरच नाही, तर प्रत्येक क्षेत्राला, आणि देशालासुद्धा समृद्ध करू शकते ही स्त्री. आतापर्यंत किती तरी स्त्रियांनी हे करून दाखवलं आहे. त्यामुळे उदाहरण द्यायची आता गरज नाही उरली असं मला वाटत."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा

व्हिडीओ

Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
Embed widget