एक्स्प्लोर
तलावात सापडलेल्या मुंडक्याभोवती फिरते पटकथा, सुरू होताच 5 मिनिटांत जबरदस्त सस्पेन्स; डोक्याच्या चिंध्या करतो मिस्ट्री फिल्मचा क्लायमॅक्स
Best Mystery Thriller Film On OTT: आजकाल वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक रहस्यमयी थ्रिलर चित्रपट रिलीज होत असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, कधीही, कुठेही, कोणताही चित्रपट पाहू शकता.
Best Mystery Thriller Film On OTT
1/12

जर तुम्ही पाहण्यासाठी भन्नाट मिस्ट्री-थ्रिलर चित्रपटाच्या शोधात असाल तर, आम्ही तुम्हाला एका उत्तम चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. 128 मिनिटांचा हा चित्रपट तुम्हाला भंडावून सोडेल. तुम्हाला तुमच्या जागेवरुन उठण्याची संधीही देणार नाही.
2/12

चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच एक सस्पेन्स सुरू होतो, जसजसा चित्रपट पुढे जातो, तसतसा हा सस्पेन्स वाढत जातो. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव 'पोलीस स्टोरी 2' आहे.
3/12

'पोलीस स्टोरी 2' हा चित्रपट मूळचा मल्याळम भाषेत बनवण्यात आला आहे. यामध्ये पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत दिसले होते. त्यांच्याशिवाय आदिती बालन, लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, सुचित्रा पिल्लई आणि शैलजा अंबू यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाची कथा एका खुनाचे गूढ उलगडण्यावर आधारित आहे.
4/12

'पोलीस स्टोरी 2' चित्रपटाच्या कथेत, चित्रपट सुरू झाल्यानंतर फक्त 5 मिनिटांनी सस्पेन्स सुरू होतो. मंत्र्यांच्या घराजवळील एका तलावात मानवी कवटी सापडल्याचे दाखवण्यात आले.
5/12

यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. एसीपी सत्यजित (पृथ्वीराज सुकुमारन) यांना प्रकरण सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
6/12

सुरुवातीच्या तपासात तलावात सापडलेली मानवी कवटी कुणाची? याचा शोध घेतला जातो. मृत व्यक्तीची हत्या झाली की, त्याच्यासोबत एखादी दुर्घटना घडली, याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू असतो.
7/12

इन्वेस्टिगेशनमध्ये समोर येतं की, तलावात सापडलेली मानवी कवटी एका तरुणीची आहे, पण आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो, तिची ओळख पटवण्याचा. एसीपी सत्यजीत मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी जंग जंग पछाडण्यास सुरुवात करतो.
8/12

'पोलीस स्टोरी 2'मध्ये हॉररचाही तडका पाहायला मिळतो. फिल्ममध्ये पाहायला मिळतं की, एक महिला जर्नालिस्ट आपल्या मुलीसोबत राहण्यासाठी भाड्यानं घत घेते. त्या घरात जर्नालिस्टसोबत महिलेसोबत भयावह घटना घडण्यास सुरुवात होते. त्यानंतर ती खूप घाबरते. पण, त्यासोबतच ती सत्य जाणून घेण्याचाही प्रयत्न करते.
9/12

जर तुम्ही 'पोलीस स्टोरी 2' फिल्म पाहायला सुरुवात केली, तर क्लायमॅक्सपर्यंत उठण्याची इच्छाच होणार नाही. एवढंच काय तर तुम्ही आरोपीबाबत जराही अंदाज लावू शकणार नाही. हेच फिल्मचं वैशिष्ट्य आहे. एका तासानं 'पोलीस स्टोरी 2'मध्ये सस्पेन्स थ्रिलची लेव्हल दुप्पट होते.
10/12

पृथ्वीराज सुकुमारनची फिल्म 'पोलीस स्टोरी'चं दिग्दर्शन Tanu Balakनं केलेलं आहे आणि याची कहाणी श्रीनाथ वी. नाथ यांनी लिहिलेली आहे. तसं पाहायला गेलं तर हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज करण्यात आला होता. पण, तुम्ही ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
11/12

'पोलीस स्टोरी 2' अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर अवेलेबल आहे. खास गोष्ट म्हणजे, जरी ही फिल्म मल्याळम भाषेत बनली असेल, पण ओटीटीवर ही फिल्म हिंदीमध्ये उपलब्ध आहे.
12/12

'पोलीस स्टोरी 2'चा रन टाईम फक्त 128 मिनिटांचा आहे. जर तुम्ही ही फिल्म पाहण्याचा विचार करत असाल, तर या विकेंडलाठी तुमची परफेक्ट मूव्ही चॉईस आहे.
Published at : 06 Mar 2025 12:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























