Special Report Ladki Bahin Yojana : 1500 चे 2100 कधी? लाडक्या बहिणीवरुन विरोधक आक्रमक
Special Report Ladki Bahin Yojana : 1500 चे 2100 कधी? लाडक्या बहिणीवरुन विरोधक आक्रमक
ख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत २ कोटी ५४ लाख महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ येत्या ८ मार्चला खात्यात जमा होईल अशी माहिती, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत दिली. शिवसेना उबठा पक्षाच्याच्या अनिल परब यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या योजनेचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर एकाही निकषात बदल केलेला नाही, असं तटकरे यांनी सांगितलं. जुलै महिन्यापासूनच या योजने अंतर्गत छाननी प्रक्रिया सुरू झाली ,संबंधित विभागाकडून इतर योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी जसजशी प्राप्त होत गेली त्यानंतर छाननी दरम्यान अर्ज बाद करण्यात आले , असं महिला बालविकास मंत्र्यांनी सांगितलं. ज्या महिलांना ६५ वर्ष पूर्ण झाली आहेत त्या आपोआपच या योजनेतून अपात्र होणार आहेत तसंच काही महिला विवाह करून दुसऱ्या राज्यात गेल्या त्या महिला अपात्र ठरल्या,असं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे बनावट खाती वापरून ज्यांनी नोंदणी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यावर कारवाई करण्यात आली असं अदिती तटकरे यांनी सांगितलं.कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही , तसंच महिलांकडून लाभ परत घेण्याची कोणतीही भूमिका शासनाची भूमिका नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीच्या जाहिरनाम्यात २१०० देण्याचं आश्वासन दिलं होतं ते कधी देणार अशी विचारणा विरोधकांनी या चर्चेत केली त्यावर उत्तर देताना तटकरे यांनी जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो त्यामुळे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना विभागाकडून हा लाभ देण्यात येईल असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
All Shows

































