एक्स्प्लोर

Beed Stone: बीडमध्ये आकाशातून पडलेल्या दोन्ही दगडांचा उलगडा झाला, शास्त्रज्ञ म्हणाले 80 सेंमीचे हे दगड..

साधारण पाव किलो वजनाचा आणि आणखी एक काळ्या रंगाचा दगड आढळून आल्याने शेतकऱ्यासह परिसरात मोठे कुतूहल वाढले होते .

Beed: बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाव किलो वजनाचे दोन दगड पडल्याचा प्रकार समोर आल्याने गावात मोठी चर्चा होती .यातील एक दगड शेतकऱ्याच्या घरावर पडल्यानंतर पत्र्याला छिद्र पडून तो थेट घरात आल्याचे दिसून आले .दुसरा दगड शेतकऱ्यांच्या घराशेजारील गायरान जागेत आढळून आला .या घटनेनंतर अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ गावात दाखल झाले होते .त्यांनी हे दोन्ही दगड ताब्यात घेतले असून आकाशातून पडलेले दोन्ही दगड उल्कापिंडत असल्याचं स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनी दिलंय . (Beed Stones)

लिमगाव येथील शेतकरी भिकाजी ज्ञानोबा अंभोरे यांच्या घरावर सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठ्ठा आवाज आला .आपल्या घरावरील पत्राचा नेमका आवाज कशाचा आला यासाठी शोधाशोध केली असता घरात गेल्यावर पत्र्याला छिद्र पडून खाली दगड पडल्याचे दिसलं. तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही दगडांचा पंचनामा केला असून हे दगड छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहे. या अभ्यासकांनी गावाला भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले होते. साधारण पाव किलो वजनाचा आणि आणखी एक काळ्या रंगाचा दगड आढळून आल्याने शेतकऱ्यासह परिसरात मोठे कुतूहल वाढले होते .शेतकऱ्याने संबंधित दगडा संदर्भात ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाला कळवले होते .त्यानंतर वडवणीचे तहसीलदार वैभव महेंद्रकर तलाठी ST यशवंत यांच्या पथकाने पंचनामाही केला .काही खगोलीय अभ्यासकांनी निमगावला भेट देऊन या दगडांची पाहणी केली . अभ्यासाअंती, साधारण 80 सेंटीमीटर आकाराचे हे उल्कापिंड असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे .

काय म्हणाले शास्त्रज्ञ ?

बीडमध्ये घडलेली घटना ही आशनीपाताशी संबंधित असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे . जी छायाचित्रने आम्हाला प्राप्त झाली, त्याच्यावरून हे काँड्राइड  स्वरूपाचा उल्कापिंड  असल्याचं आढळून येत आहे . त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार ज्या घराचा पत्रा फोडून एकदा गड खाली पडला तर ज्या मुलांनी आकाशातून दगड खाली पडताना पाहिला त्यावरून तरी हा आशनीपाताचा प्रकार असावा असे जाणवत असल्याचे खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी 'एबीपी माझा ' ला सांगितलं .लवकरच या उल्कापिंडाला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्याशास्त्रज्ञांकडून ताब्यात घेण्यात येणार आहे .त्यांच्याकडून त्याचा विश्लेषण करण्यात येईल तेव्हा नेमकं चित्र स्पष्ट होईल .असंही ते म्हणालेत .

हेही वाचा:

बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Karuna Sharma on Pankaja Munde and Dhananjay Munde: पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Embed widget