Andheri Bypoll Elections Special Report : उद्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचं मतदान, ऋतुजा लटके मैदानात
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातून अखेर आज मतदान होतंय आणि ६ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली.
सगळे कार्यक्रम
![Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/579ed337d13c6efc04a38dd3e66a32151739812157511977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/6e3b9980021c90651ec3ad9d9e8a908f1739809843152977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/0fbb8eaf2b178442f038a94038f5a1df1739809395685977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/248ebc35dd5e5759ee762163c7d9aff31739727442997718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/b2035ff34da147fc633da0268a0057381739644597101718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)