एक्स्प्लोर

IPL पेक्षाही भव्यदिव्य, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगसाठी सौदीची तयारी, भारत-पाकिस्तानचे खेळाडू घेणार भाग

Richest Cricket League : आता आयपीएलपेक्षाही भव्यदिव्य क्रिकेट लीग स्पर्धा सुरु करण्याचे सौदी अरेबिया प्लॅनिंग करत आहे.

Richest Cricket League : आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. जगभरातील इतर क्रिकेट लीगच्या तुलनेत आयपीएलमध्ये खूप पैशांचा पाऊस पडतो. अनेक क्रिकेटर कोट्यवधींची कमाई करतात.. त्याशिवाय इतर अनेक बाबीमध्ये आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. पण आता आयपीएलपेक्षाही भव्यदिव्य क्रिकेट लीग स्पर्धा सुरु करण्याचे सौदी अरेबिया प्लॅनिंग करत आहे. यासाठी ते बीसीसीआय आणि आयपीएल संघ मालकाची मदत घेणार असल्याचे समजतेय. विशेष म्हणजे, सौदी अरेबियातील या लीगमध्ये भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेटपटू एकत्र खेळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाला क्रिकेट लीग सुरु करण्यासाठी बीसीसीआय मदत करणार आहे. नुकतीच  जय शाह, आशिष शेलार, राजीव शुक्ला यांची एक बैठक झाल्याचे समोर आलेय. यामध्ये सौदीमधील श्रीमंत राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचे समजतेय. 

The Sydney Morning Herald आणि The Age या प्रसारमाध्यमांनी सौदी जगातील सर्वात भव्यदिव्य क्रिकेट लीग सुरु करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दिले आहे. तसेच त्यांना बीसीसीआय आणि आयपीएल संघ मदत करणार असल्याचेही समोर आलेय. सौदी अरेबियाला या लीगसाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागणार आहे.  सौदी अरेबिया सरकार क्रिकेट लीगसाठी बीसीसीआय आणि आयपीएल संघ मालकांसोबत चर्चा करत आहे. 

सध्या बीसीसीआयकडून भारतीय खेळाडूंना इतर क्रिकेट लीगमध्ये खेळण्यावर बंदी आहे. पण सौदी अरबने क्रिकेट लीगची घोषणा केल्यानंतर बीसीसीआय आपल्या नियमांत बदल करु शकते.  द एजच्या एका रिपोर्ट्सनुसार, मागील एक वर्षापासून सौदी अरब आपल्या देशात क्रिकेट लीगची चर्चा करत आहे. जगभरात क्रिकेट लीग सुरु करण्यात येत असेल आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत असतील तर आयसीसीची परवानगी घ्यावी लागते. सौदी अरब बीसीसीआय आणि आयपीएल संघमालकासोबतच्या चर्चेनंतर आयसीसीकडूनही परवानगी घ्यावी लागणार आहे. 

आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी याआधीच सौदी क्रिकेटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार असल्याचे सांगितेल होते. फूटबॉल आणि एफ 1 यासारख्या खेळामध्ये पैसे गुंतवल्यानंतर सौदी क्रिकेटमध्ये पैसे गुंतवण्यास इच्छुक असल्याचे बार्केले म्हणाले होते. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार सौदी क्रिकेटच्या माध्यमातून भारतासोबतचे संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सौदी 2030 पर्यंत भारतीयांसाठी आघाडीचे पर्यटनस्थळ होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात आयपीएल सौदीमध्येच आयोजित करण्यात आले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलंMumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरुMumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget