एक्स्प्लोर

Gill First IPL Century : गिलने जिता दिल..... शुभमनचे दमदार शतक

Gill First IPL Century : गुजरातचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिल याने हैदराबादविरोधात शतकी खेळी केली. शुभमन गिल याने संयमी फलंदाजी करत गुजरातचा डाव सावरला..

Gill First IPL Century : गुजरातचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिल याने हैदराबादविरोधात शतकी खेळी केली. शुभमन गिल याने संयमी फलंदाजी करत गुजरातचा डाव सावरला.. शुभमन गिल याने साई सुदर्शनसोबत गुजरातच्या डावाला आकार दिला. एका बाजूला विकेट पडत असताना शुभमन गिल याने शतकाला गवसणी घातली. शुभमन गिल याने 56 चेंडूत शतकी खेळी केली. शुभमन गिल याने 13 चौकार आणि एका षटकारासह शतकाला गवसणी घातली. शुभमन गिल याची खेळी भुवनेश्वर कुमार याने 101 धावांवर संपुष्टात आणली. शुभमन गिलचे हे आयपीएलमधील पहिलेच शतक होय. 7 मे रोजी शुभमन गिल याचे शतक हुकले होते.. तेव्हा शुभमन गिल याने शतक होईल, असा विश्वास वर्तवला होता.

गिल-साई सुदर्शनची दमदार भागिदारी -

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने वृद्धीमान साहा याला माघारी धाडले. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 चेंडूत 147 धावांची भागिदारी केली. या दोघांच्या भागिदारीच्या जोरावर गुजरातच्या डावाला आकार मिळाला. 147 धावांच्या भपागिदारीमध्ये शुभमन गिल याने 48 चेंडूत 89 धावांचे योगदान दिले. तर साई सुदर्शन याने 36 चेंडूत 47 धावा जोडल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांची भागिदारी गुजरातसाठी निर्णायक ठरली. 

यंदाच्या हंगामातील सहावे शतक - 

यंदाच्या हंगामातील हे सहावे शतक ठरले. गिल याने संयमी फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. शुभमन गिल याच्याआधी सूर्यकुमार यादव, यशस्वी जायस्वाल, प्रभसिमरन, वेंकटेश अय्यर आणि हॅरी ब्रूक यांनी यंदाच्या आयपीएलमद्ये शतकाला गवसणी घातली आहे. 

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गिलची कामगिरी - 

यंदाच्या हंगामात नरेंद्र मोदी स्टेडिअमवर शुभमन गिल याने धावांचा पाऊस पाडलाय. सात डावात गिल याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. शुभमन गिल फक्त एका डावात दुहेरी धावसंख्या ओलांडू शकला नाही, अन्यथा प्रत्येक डावात त्याने चांगली फलंदाजी केली आहे. पाहा यंदाच्या हंगामात नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गिलची कामगिरी... 

63(36) vs CSK
39(31) vs KKR
45(34) vs RR
56(34) vs MI
6(7) vs DC
94*(51) vs LSG
101(58) vs SRH

यंदा गिलीच कामगिरी कशी ?

गुजरातसाठी पहिले शतक लगावण्याचा मान शुभमन गिल याने पटकावलाय. शुभमन गिल याने या शतकी खेळीसह ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत मोठी उडी घेतली आहे. शुभमन गिल याच्या नावावर 576 धावांची नोंद झाली आहे. त्याने यशस्वी जयस्वालसह सूर्यकुमार यादव आणि डेवेन कॉनवे यांनाही मागे टाकलेय. गिलच्या पुढे आता फक्त फाफ डु प्लेसिस आहे. फाफच्या नावावर 631 धावा आहेत. शुभमन गिल याने यंदा चार शतके आणि एक शतक झळकावलेय. गिलने 13 डावात 48 च्या सरासरीने 576 धावा केल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागतABP Majha Headlines : 05 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सOne Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : संध्याकाळच्या बातम्या : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Yuvraj Singh Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Embed widget