Neeraj Chopra : नीरज चोप्राची अप्रतिम कामगिरी सुरुच; फिनलँडमध्ये Kuortane Games मध्ये मिळवलं सुवर्णपदक
Neeraj Chopra : भारताचा ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने फिनलँडमध्ये कुओर्ताने स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं आहे.
Kuortane Games 2022 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic Games) सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राने त्याचा भन्नाट फॉर्म कायम ठेवला आहे. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्णपदाकाला गवसणी घातली आहे. नीरज चोप्राने फिनलँड येथील कुओर्ताने स्पर्धेत (Kuortane Games) सुवर्णपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने या स्पर्धेत 86.89 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
विशेष म्हणजे नीरजने फिनलँडमध्ये काही दिवसांपूर्वी नुरमी गेम्समध्ये 89.30 मीटर अंतरापर्यंत भाला फेकत स्वत:चाच ऑलिम्पिकमधील आणि राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला होता. त्यावेळी तो सुवर्णपदक पटकावू शकला नाही. फिनलँडमधील स्पर्धेत 25 वर्षीय ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. त्याने 89.83 मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या सर्वोत्तम कामगिरीशिवाय, त्याने 88.02 मीटर आणि 80.36 मीटर अशी कामगिरी नोंदवली. पण आज मात्र त्याने गोल्ड मिळवलं आहे.
कॉमनवेल्थमध्ये भारताचं नेतृत्त्व करणार
क्रिडा जगतातील एक मानाची स्पर्धा असणारे कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) यंदा इंग्लंडमध्ये पार पडणार आहेत. इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात कॉमनवेल्थ गेम्स 2022 जुलै-ऑगस्ट महिन्यात पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय खेळाडूंची घोषणा झाली आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) नेतृत्त्वाखाली 37 खेळाडूंचं पथक इंग्लंडला जाणार आहे. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (Athletics Federation of India) यांनी कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवडण्यात आलेल्या 37 खेळाडूंमध्ये 18 महिला असून उर्वरीत पुरुष आहेत.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रासह 37 खेळाडू कॉमनवेल्थ गेम्ससाठी सज्ज; बर्मिंगहममध्ये रचणार इतिहास
- Commonwealth Games 2022 : खेळाडूंना मानसिक तणावाशी सामना करण्यासाठी ट्रेनिंग द्यायला हवी; कॉमनवेल्थचं तिकीट मिळाल्यानंतर निखत जरीनचं वक्तव्य
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारताला मोठा झटका, दिग्गज बॉक्सर मेरी कोमची माघार