EURO Cup 2024 Portugal vs France: फ्रान्सचा पोर्तुगालविरुद्ध दणदणीत विजय; पेनल्टी किकवर जिंकला सामना, उपांत्य फेरीत दाखल
EURO Cup 2024 Portugal vs France: आता फ्रान्स आणि स्पेन यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
EURO Cup 2024 Portugal vs France: यूरो कप 2024 च्या स्पर्धेत (EURO Cup 2024) फ्रान्स आणि पोर्तुगाल (Portugal vs France) यांच्यात उपांत्य फेरीपूर्व लढत झाली. या सामन्यात फ्रान्सने पोर्तुगालचा पेनल्टी शूटआऊटमध्ये (5-3) पराभव केला. या विजयासह फ्रान्सचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. आता फ्रान्स आणि स्पेन यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
🇫🇷 France are faultless in the penalty shootout to advance 👏#EURO2024 | #PORFRA pic.twitter.com/6jdxFKs3XM
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 5, 2024
🇪🇸🆚🇫🇷 Semi-final locked in 🔒
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 5, 2024
🗓️ Tuesday 9 July 2024#EURO2024 pic.twitter.com/U7UTLPWvat
फ्रान्सने चमकदार कामगिरी करत पाचही पेनल्टीवर गोल केले, पण पोर्तुगालसाठी जोआओ फेलिक्स चुकला, त्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याच्या संघाची या स्पर्धेतील मोहीम संपुष्टात आली. जोआओ फेलिक्स हा पेनल्टी शूटआऊटमध्ये चुकणारा एकमेव खेळाडू होता. थियो हर्नांडेझने विजयी स्पॉट-किक मारली. तत्पूर्वी, मिकेल मेरिनोने उशिरा केलेल्या गोलमुळे स्पेनने अतिरिक्त वेळेत जर्मनीचा पराभव केला.
Theo x Mike#EURO2024 | #PORFRA pic.twitter.com/efIEQEgZ44
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 5, 2024