Austria vs Netherlands : ऑस्ट्रियानं नेदरलँडला लोळवलं, 3-2 गोलनं विजयाला गवसणी अन् फ्रान्सला देखील धोबीपछाड
Austria vs Netherlands : यूरो कपमधील रंगत आता वाढू लागली आहे. ऑस्ट्रियानं नेदरलँडला 3-2 अशा गोलनं पराभूत केलं. ऑस्ट्रियानं या विजयासह फ्रान्सला देखील धोबीपछाड दिला.
बर्लिन : यूरो कपची रंगत आता वाढू लागली आहे. यूरो कपमध्ये एकूण 24 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटात 4 संघ या प्रमाणं 6 गटांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप डी मधील ऑस्ट्रिया आणि नेदरलँडस या दोन संघांमध्ये महत्त्वाचा सामना पार पडला. ऑस्ट्रियानं नेदरलँडसवर 3-2 गोलनं विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रिया ग्रुप डी मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे.
ऑस्ट्रिया आणि नेदरलँडस यांच्यात सामना 2-2 अशा बरोबरीत असताना मार्सल सॅबिटेझरनं केलेला गोल निर्णायक ठरला. या गोलमुळं ऑस्ट्रियाला आघाडी मिळाली. या विजयानंतर प्रेक्षकांनी ग्रुप विनर ग्रुप विनर अशी घोषणाबाजी केली.
ऑस्ट्रियाला पहिला धक्का त्यांच्याच खेळाडूमुळं बसला. डॉनयेल मालेन यानं ऑस्ट्रियाच्याच नेटमध्ये सेल्फ गोल केला. यानंतर ऑस्ट्रियाच्या कॉडी गकपो यानं ब्रेकनंतर गोल केला त्यामुळं ऑस्ट्रियानं नेदरलँड विरुद्ध बरोबरी केली.
यानंतर ऑस्टियाच्या रोमॅनो स्किहमिड यानं एक गोल केला त्यामुळं त्यांनी नेदरलँडवर 2-1 अशी आघाडी मिळाली. यानंतर नेदरलँडच्या मेम्फिस डेपाय यानं 75 व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी करुन दिली. यानंतर मार्सल सॅबिटेझरनं यानं निर्णायक गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रिया अव्वलस्थानी
ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रिया, फ्रान्स, नेदरलँडस, पोलंड या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रियानं नेदरलँडसला 3-2 गोलनं पराभूत केलं. यासह ऑस्ट्रियानं फ्रान्सला ग्रुप डी मध्ये पिछाडीवर टाकलं आहे. ऑस्ट्रियाकडे आता 6 गुण आहेत. तर, फ्रान्सकडे 5, तर नेदरलँडकडे 4 आणि पोलंडकडे 1 गुण आहे. ऑस्ट्रियानं दोन मॅच जिंकल्या आहेत. तर, फ्रान्सनं एक मॅच जिंकली तर त्यांच्या दोन मॅच ड्रॉ झाल्या.
ऑस्ट्रिया ग्रुप डी मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे. आता त्यांची लढत ग्रुप एफ मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघासोबत होईल. ग्रुप एफमधून तुर्की, जॉर्जिया आणि झेक रिपब्लिक या पैकी एखादा संघ ग्रुप एफमध्ये दुसऱ्या स्थानी असेल.
यूरो कपमध्ये ग्रुप डीमधील लढतींकडे सर्वाधिक लक्ष लागलं होतं. यूरोपमधील दोन मोठे संघ या ग्रुपमध्ये होते. फ्रान्स आणि नेदरलँडस या दोन तगड्या संघांऐवजी ऑस्ट्रियानं 6 गुण मिळवत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर, फ्रान्स दुसऱ्या स्थानी राहिलं आहे. या ग्रुपमधून पोलंड स्पर्धेबाहेर गेलं आहे. ऑस्ट्रिया डी ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलं असून यूरो कपच्या इतिहासात ते नॉकआऊट स्टेजमध्ये दुसऱ्यांदा पोहोचले आहेत.
फ्रान्स दुसऱ्या स्थानी राहिल्यानं त्यांची लढत ग्रुप ईमधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघासोबत होईल.
संबंधित बातम्या :
EURO 2024 : पोर्तुगालचा झेक रिपब्लिकवर 2-1 नं नाट्यमय विजय,रोनाल्डोनं किती गोल केले?