EURO 2024 : पोर्तुगालचा झेक रिपब्लिकवर 2-1 नं नाट्यमय विजय,रोनाल्डोनं किती गोल केले?
EURO 2024 : यूरो कप मध्ये पोर्तुगालनं अटीतटीच्या लढतीत झेक रिपब्लिकवर 2-1 नं विजय मिळवला आहे. 21 वर्षीय युवा खेळाडू फ्रान्सिस्को कॉन्सेसिओनं अखेरच्या क्षणाला गोल केल्यानं पोर्तुगालनं विजय मिळवला.
नवी दिल्ली : पोर्तुगालनं फ्रान्सिस्को कॉन्सेसिओच्या गोलच्या जोरावर झेक रिपब्लिकवर 2-1 असा नाट्यमय विजय मिळवला आहे. पोर्तुगालची यूरो कपमधील ही पहिली मॅच होती. 21 वर्षीय फ्रान्सिस्को कॉन्सेसिओचा गोल झेक रिपब्लिकचे खेळाडू रोखू शकले नाहीत आणि पोर्तुगालनं विजय मिळवला.
झेक रिपब्लिकनं 60 व्या मिनिटाला एक गोल करत आघाडी घेतली होती. हा गोल लुकास प्रोवोडनं केला होता. पोर्तुगालनं सामन्यावर चांगली पकड कायम ठेवली होती. दुसरीकडे रॉबीन हरनॅकनं सेल्फ गोल केल्यानं पोर्तुगालला एक गुण मिळाला. त्यामुळं मॅच बरोबरीत सुरु होती.
अखेर 92 व्या मिनिटाला झेक रिपब्लिक विरुद्ध फ्रान्सिस्को कॉन्सेसिओनं नाट्यमय गोल करत पोर्तुगालला विजयी आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे ख्रिस्तियानो रोनाल्डोनं सहाव्यांदा यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला. झेक रिपब्लिकचा गोलकीपर जिंड्रीच स्टेनक रोनाल्डोला गोल करण्यापासून रोखलं.
REPORT: Portugal recover in the second half to snatch victory with Francisco Conceição's dramatic winner 📰👇#EURO2024 | #PORCZE
— UEFA EURO 2024 (@EURO2024) June 18, 2024
पोर्तुगालची विजयी सुरुवात
2016 मध्ये यूरो कप जिंकणाऱ्या पोर्तुगालनं यंदाच्या यूरो कपची विजयानं सुरुवात केली आहे. पोर्तुगालनं झेक रिपब्लिक विरुद्ध पहिल्या पासून वर्चस्व ठेवलं होतं. मात्र, 60 व्या मिनिटाला झेक रिपब्लिकनं गोल करत आघाडी घेतली होती. त्यानंतर रॉबीन हरनॅकनं केलेला सेल्फ गोल झेक रिपब्लिकला महागात पडला. त्यामुळं पोर्तुगाल अन् झेक रिपब्लिक बरोबरीत आले. यानंतर दोन्ही संघांमध्ये विजयासाठी जोरदार लढत सुरु होती. अखेर 92 व्या मिनिटाला फ्रान्सिस्को कॉन्सेसिओनं केलेल्या गोलमुळं पोर्तुगालला नाट्यमय विजय मिळाला.
रोनाल्डोचा गोल बाद ठरवला गेला
ख्रिस्तियानो रोनाल्डोनं केलेला एका गोलचा रिव्यू घेण्यात आला. तो बाद ठरवण्यात आल्यानं पोर्तुगालला फटका बसला.
दरम्यान, पोर्तुगालचे कोच रॉबर्टो मार्टिनेझ यांनी 41 वर्षीय पेपेची संघात निवड केल्यानं तो यूरो कपच्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. पोर्तुगालनं झेक रिपब्ल्किचा बचाव भेदत 92 व्या मिनिटाला गोल केल्यानं त्यांनी विजय मिळवला.
पोर्तुगालचा स्ट्राईकर रोनाल्डो आणि झेक रिपब्लिकचा स्ट्राईकर पॅट्रिक दोघेही या मॅचमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत. 2020 च्या यूरो कपमध्ये दोघांनी दमदार कामगिरी केली होती. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत ते पहिल्या स्थानावर होते. फ्रान्सिस्को कॉन्सेसिओच्या गोलमुळं पोर्तुगालनं टर्कीसोबत एफ गटात बरोबरी केली आहे.
संंबंधित बातम्या :