
IND vs PAK :ट्रॅक्टरचे पैसे भारतानं वसूल केले, सूर्यकुमार यादवचं कौतुक करत पाकिस्तानचा चाहता काय म्हणाला?
T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा एक चाहता ट्रॅक्टर विकून भारताविरुद्धची मॅच पाहण्यासाठी अमेरिकेत पोहोचला होता. मात्र, भारतानं पाकिस्तानला हरवल्यानं त्याचा हिरमोड झाला होता.

न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी20 वर्ल्ड कपमधील मॅच 9 जूनला पार पडली. भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तानातून एक चाहता त्याचा ट्रॅक्टर विकून भारताविरुद्धची मॅच पाहण्यासाठी आला होता. मात्र, भारतानं पाकिस्तानला पराभूत केल्यानं तो निराश झाला होता. फॅननं म्हटलं ट्रॅक्टर विकून मॅच पाहण्यासाठी आलो. मात्र, सूर्यकुमार यादवमुळं पैसे वसूल झाले.
भारत आणि पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी आलेला चाहता पराभवामुळं निराश झाला होता. तो पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका मॅच पाहण्यासाठी आला होता. तो म्हणाला की, मी तीन हजार डॉलरला ट्रॅक्टर विकून भारत आणि पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी आलो होतो. मात्र, आमच्या संघाचा पराभव झाल्यानं निराश झालो होतो. भारतीय चाहत्यांनी मला पाठिंबा दिला. अनेक मेसेज आले, त्यामुळं भारताला पाठिंबा द्यायला पाहिजे असं वाटलं त्यामुळं अमेरिकेविरुद्धची मॅच पाहण्यासाठी आलो, असं पाकिस्तानी चाहता म्हणाला. ट्रॅक्टर विकून बाबरची मॅच पाहण्यासाठी आलो मात्र, सूर्यकुमार यादवनं माझं मन जिंकलं, असं तो चाहता म्हणाला. आज खूप आनंद वाटला, ट्रॅक्टरचे पैसे भारतानं वसूल केले, असं तो म्हणाला.
#WATCH | New York, USA: "I sold my tractor for $3000 to watch the India vs Pakistan match, in which we lost. I was very disappointed... Surya has won my heart today. Tractor ke paise India ne vasool karva diye," says a Pakistani fan on India's win against US in the T20 World Cup. pic.twitter.com/9wJdoOjpRS
— ANI (@ANI) June 13, 2024
भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. भारतानं टी20 वर्ल्ड कपमध्ये तिसरी मॅच खेळताना अमेरिकेला पराभूत केलं. भारतानं अमेरिकेवर 7 विकेटनं विजय मिळवला. अमेरिकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 110 धावा केल्या. भारतानं 19 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. सूर्यकुमार यादवनं 49 बॉलमध्ये 50 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं 2 चौकार आणि 2 षटकार मारले.
भारतानं सुपर 8 मधील स्थान निश्चित केलं आहे. सुपर 8 मध्ये भारत तीन सामने खेळेल. त्यापैकी एक मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल. दरम्यान भारताची ग्रुप स्टेजमधील अजून एक मॅच बाकी आहे. भारत विरुद्ध कॅनडा ही मॅच फ्लोरिडामध्ये होणार आहे. मात्र, तिथं सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं भारत आणि कॅनडा मॅचवर अनिश्चिततेचं सावट आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
