Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Milind Narvekar : उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर वारंवार महाविकास आघाडीच्या विचारांच्या विपरीत भूमिका घेताना दिसत आहेत.
Milind Narvekar, Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी वाल्मीक कराड (Walmik Karad) सीआयडी समोर सरेंडर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचं अभिनंदन करत एक्स पोस्ट केली... मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या या एक्स पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचे अशाप्रकारे अभिनंदन करणे म्हणजे एक प्रकारे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची (Uddhav Thackeray Shivsena) जवळीक वाढवणं आहे का? की मग ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षा वेगळी मिलिंद नार्वेकर यांची भूमिका आहे ? कारण या आधी सुद्धा मिलिंद नार्वेकर यांच्या अशाच प्रकारच्या एक्स पोस्ट चर्चेचा विषय बनल्या होत्या... पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट
ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या मागील दिवसातील काही एक्स पोस्ट या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनल्या आहेत... शिवसेना ठाकरे गटाचे विरोधक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जाहीरपणे नार्वेकर यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अभिनंदन असू द्या किंवा कट्टर विरोधक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केले जाणारे अभिनंदन... किंवा मग ज्या पोलीस महासंचालकांना पदावरून हटवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पक्ष मागणी करत असताना त्या पुन्हा महासंचालक पदी रुजू झाल्यानंतर नार्वेकर यांनी रश्मी शुक्ला यांचं केलेलं अभिनंदन असू द्या...
मिलिंद नार्वेकर यांनी मागील काही दिवसात केलेल्या एक्स पोस्ट आणि त्यावर झालेली चर्चा
28 नोव्हेंबर -
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाची (DGP) जबाबदारी स्वीकारल्याबद्दल रश्मी शुक्ला जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
5 डिसेंबर -
देवेंद्र फडणवीस जी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच श्री.एकनाथ शिंदे जी व श्री. अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
31 डिसेंबर -
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जी यांचे अभिनंदन!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जी यांचे अभिनंदन!
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 31, 2024
याशिवाय सहा डिसेंबरला बाबरी मज्जिद पाडल्याचा समर्थनार्थ केल्याची पोस्ट मिलिंद नार्वेकर यांनी केली होती... "हे ज्यांनी केलं त्याचा मला अभिमान आहे - वंदनीय बाळासाहेब ठाकरे'... या पोस्ट नंतर समाजवादी पक्ष नाराज झाला आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय राज्यातील समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी घेतला... मात्र नार्वेकरांच्या कट्टर हिंदुत्ववादाच्या पोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी समर्थन केलं... मात्र या सगळ्या एक्स पोस्टवर नार्वेकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळलं... व आपली भूमिका सोशल माध्यमातून ते मांडत राहत आहेत
एकीकडे बाबरी मज्जिद पाडल्याच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्ट जरी ठाकरेंच्या शिवसेनेने समर्थन केला असलं... तरी आपल्या कट्टर विरोधक एकनाथ शिंदे यांचे किंवा मग देवेंद्र फडणवीस यांचे जाहीरपणे अभिनंदन असू द्या किंवा महासंचालक पदी रुजू झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांचे नार्वेकरांनी केलेला अभिनंदन असू द्या... यातून नार्वेकर पक्षाची भाजपसोबतची जवळीक वाढवत आहेत ? की मग पक्षाच्या विरोधी भूमिका घेत आहेत ? याचे उत्तर नार्वेकर सध्यातरी जाहीरपणे न देता सोशल मीडियाद्वारे देत असले तरी त्यांना यातून नेमकं काय साधायचा आहे? याचे उत्तर आता नार्वेकरांना द्यायचं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या