एक्स्प्लोर

Virat Kohli : न्यूयॉर्कमध्ये स्थिती वेगळी होती,सुपर 8 मध्ये तुम्हाला खरा विराट कोहली पाहायला मिळेल : इरफान पठाण

Virat Kohli : आज सुपर 8 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने येणार आहेत. विराट कोहली या मॅचमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बारबाडोस : टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) सुपर 8 च्या (Super 8) लढती सुरु झाल्या आहेत. आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) आमने सामने येणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री 8 वाजता ही मॅच सुरु होईल. सुपर 8 मध्ये भारतीय चाहत्यांचं लक्ष विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्याकडे लागलं आहे. विराट कोहलीला ग्रुप स्टेजमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन रोहित शर्मानं नवा प्रयोग केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करत आहेत. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण यानं विराट कोहलीला पाठिंबा देणारं वक्तव्य केलं आहे. तुम्हाला सुपर 8 मध्ये खरा विराट कोहली पाहायला मिळेल, असं इरफान पठाण यानं म्हटलं आहे. 

इरफान पठाण म्हणाला की विराट कोहलीला मोठ्या मॅचेसमध्ये कशी कामगिरी करायचं हे माहिती आहे. विराट  कोहली याच गोष्टीमुळं स्पेशल ठरतो, असं इरफान पठाण यानं सांगितलं.

इरफान पुढं म्हणाला की, टीम इंडियासाठी कोहली त्याची कामगिरी करुन दाखवेल.  विशेषत: जेव्हा मोठ्या मॅचेस असतात त्यावेळी विराट कोहलीनं कामगिरी करुन दाखवली आहे. तुम्ही फक्त वाट पाहा  विराट कोहली  आजच्या मॅचमध्ये स्लॉग स्वीप मारताना पाहायला मिळेल, असं इरफान पठाण यानं म्हटलं. न्यूयॉर्कमधील स्थिती आव्हानात्मक होती. आता परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला खरा विराट कोहली पाहायला मिळेल, असं इरफान पठाण यानं म्हटलं. 

विराट कोहलीनं यापूर्वी भारतासाठी महत्त्वाच्या मॅचेसमध्ये दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून डावाची सुरुवात करताना विराटनं सर्वाधिक धावा केल्या होत्या. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकली होती. 

राशिद खान विरुद्ध आक्रमक फलंदाजी करावी लागणार : अंबाती रायडू 

टीम इंडियाचा माजी खेळाडू अंबाती रायडू यानं राशिद खान विरुद्ध चांगली फलंदाजी करावी लागेल. तुमच्यापुढं राशिध खानचं आव्हान असेल. राशिद खानच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करण्याची गरज असल्याचं देखील रायडूनं म्हटलं. फलंदाज म्हणून तुम्हाला राशिद खानच्या कमजोर बॉलची वाट पाहावी लागेल. तो दुखापतीनंतर उपचार घेऊन पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागल्यानंतर पहिल्यासारखी जादुई कामगिरी करु शकले नाहीत, असं अंबाती रायडू म्हणाला. 

भारताची संभाव्य टीम: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 : शिवम दुबे सुपर-8 मध्ये टीम इंडियासाठी ठरणार एक्स फॅक्टर, जाणून घ्या कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Pandharpur: पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम,नक्की प्रकरण काय?
पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम, नक्की प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Pune Station : पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28 Sepember 2024ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Pandharpur: पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम,नक्की प्रकरण काय?
पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम, नक्की प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Pune Station : पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Embed widget