T20 World Cup 2024 : शिवम दुबे सुपर-8 मध्ये टीम इंडियासाठी ठरणार एक्स फॅक्टर, जाणून घ्या कारण
Shivam Dube : स्टार अष्टपैलू शिवम दुबे सुपर-8 सामन्यात भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरु शकतो. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यावर दुबेची बॅट चालण्याची शक्यता आहे.
Shivam Dube In Super-8 : साखळी सामन्यानंतर टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आता सुपर 8 चा थरार रंगणार आहे. सुपर 8 मध्ये टीम इंडिया तीन सामने खेळणार आहे. यामध्ये शिवम दुबे (Shivam Dube) टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर ठऱण्याची शक्यता आहे. शिवम दुबेची बॅट सुपर 8 मध्ये तळपू शकते. साखळी सामन्यात दुबेला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, त्याला खेळपट्टी हे एक महत्वाचं कारण आहे. आता वेस्ट इंडिजमधील खेळपट्टी अमेरिकासाठी संथ नसेल. चेंडू बॅटवर आरामात येईल, आशा स्थितीमध्ये फिरकीविरोधात दुबे आक्रमक फलंदाजी करु शकतो. फिरकी गोलंदाजीविरोधात दुबेची बॅट नेहमीच तळपली आहे. आता सुपर 8 मध्ये दुबे आक्रमक फलंदाजी करण्याची शक्यता आहे.
साखळी सामन्यात शिवम दुबे याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अमेरिकेचा अपवाद वगळता दोन्ही सामन्यात त्याला अपयश आले. पाकिस्तान आणि आयर्लंडविरोधात प्रभावी कामगिरी करता आली नाही. अमेरिकाविरोधात दुबे याने नाबाद 31 धावांची खेळी केली होती. आता सुपर 8 मध्ये दुबे शानदार कामगिरी करण्यास सज्ज झालाय. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यावर आणि फिरकीविरोधात दुबे शानदार कामगिरी कऱण्याची शक्यता आहे. दुबे मधल्या षटकात फलंदाजीला येतो, त्यावेळी फिरकी गोलंदाजी असते. शिवम दुबे फिरकी गोलंदाजीविरोधात नेहमीच आक्रमक फलंदाजी करतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असतो. सुपर 8 मध्ये दुबे आपल्या फटकेबाजीने भारतीय संघाला विजयी मिळवून देऊ शकतो.
वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या फिरकीला पोषक मानल्या जातात. साखळी फेरीतील वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा दबदबा दिसला. सुपर 8 मध्येही फिरकी गोलंदाज प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. आशा स्थितीमध्ये टीम इंडियासाठी शिवम दुबे एक्स फॅक्टर ठरु शकतो. कारण, फिरकी गोलंदाजांचा समाचार घेण्यात दुबे माहिर आहे. फिरकी गोलंदाजी खेळण्यात शिवम दुबेला स्पेशालिस्ट मानले जाते. त्यामुळे सुपर 8 मधील सामन्यात शिवम दुबेच्या कामगिरीकडे नजरा असतील.
फिरकीविरोधात दुबेचा रेकॉर्ड कसाय ?
स्पिन स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबेने आयपीएल 2024 मध्ये फिरकीविरोधात खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. त्याने 11 डावात 21.75 च्या सरासरीने आणि 156 च्या स्ट्राईक रेटने 56 चेंडूमध्ये 87 धावांचा पाऊस पाडलाय. यादरम्यान त्याने आठ षटकार आणि चार चौकार ठोकले आहेत. यादरम्यान त्याने चार वेळा आपली विकेटही फेकली आहे. वेस्ट इंडिजमध्ये फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्टवर दुबे कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच्या नजरा असतील.
शिवम दुबेचं टी20 करिअर -
शिवम दुबे टीम इंडियासाठी टी20 क्रिकेट खेळताना दिसतो. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 24 टी20 सामने खेलळे आहेत. त्याने 17 डावात फलंदाजी करताना 39 च्या सरासरीने आणि 132 च्या स्ट्राईक रेटने 310 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 63 इतकी आहे. 20 डावात गोलंदाजी करताना त्याने 8 विकेटही घेतल्या आहेत.