1983 World Cup: 1983 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला किती मानधन मिळायचं? पाहिल्यावर बसेल आश्चर्याचा धक्का
1983 Players Match Fee: माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 25 जून 1983 लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचला होता.
1983 Players Match Fee: माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 25 जून 1983 लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचला होता. 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं वेस्टइंडिजच्या संघाला नेस्तनाबूत करत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं होतं. या विजयासह भारतानं वेस्ट इंडिजचं सलग तीन विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं होतं. भारतानं मिळवलेल्या या विजयाला 38 वर्ष झालीत तरी त्याच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत. बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जातं. मात्र, 1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या शिलेदारांना त्यावेळी किती मानधन मिळायचं? हे वाचल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
1983 विश्वचषकातील भारतीय संघ
भारतीय संघात त्यावेळी कपिल देव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावस्कर, कृष्णामाचारी श्रीकांत, यशपाल शर्मा, संदीप पाटिल, कीर्ति आजाद, रॉजर बिन्नी, मदनलाल, सैय्यद किरमानी, बलविंदर सिंह संधू, दिलीप वेंगसरकर, रवि शास्त्री हे खेळाडू होते तर बिशनसिंग बेदी हे भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि व्यवस्थापकाला तीन दिवसांचा एकूण भत्ता 600 रुपये आणि मॅच फीसह 1500 असे एकूण 2100 रुपये देण्यात आले.
फोटो-
भारतीय क्रिकेटपटूंना आता किती वार्षिक मानधन मिळतं?
'अ+' श्रेणी (सात कोटी) – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
'अ' श्रेणी (पाच कोटी) – आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत, केएल राहुल.
'ब' श्रेणी (तीन कोटी) – हार्दिक पंड्या, वृद्धिमान सहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मयंक अगरवाल.
'क' श्रेणी (एक कोटी) – मनीष पांडे, हनुमा विहारी, नवदीप सैनी, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.
हे देखील वाचा-