(Source: ECI/ABP News/ABP Majha)
David Warner: ऐकत नाही भाऊ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या 16000 धावा, दिग्गजांच्या पंक्तीत स्थान!
David Warner: पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियालाचार धावांनी पराभूत केलंय. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं मालिकेत 3-1 अशी आघाडी घेऊन मालिकेवक कब्जा केलाय.
David Warner: पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाला (SL vs AUS) चार धावांनी पराभूत केलंय. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं मालिकेत 3-1 अशी आघाडी घेऊन मालिकेवक कब्जा केलाय. या मालिकेतील पाचवा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल. तब्बल 30 वर्षानंतर श्रीलंकेच्या संघाला मायदेशात ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्यात यश आलंय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरचं (David Warner) एका धावानं शतक हुकलं. मात्र, त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 हजार धावांचा टप्पा गाठलाय. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ठरलाय.
दिग्गजांच्या पंक्तीत स्थान
डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात 62 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी वॉर्नरच्या नावावर 15 हजार 938 धावा होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा सहावा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. ज्याने 559 सामन्यांमध्ये 27 हजार 368 धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीत स्टीव्ह वॉ (18 हजार 496), अॅलन बॉर्डर (17 हजार 698), मायकेल क्लार्क (17 हजार 112) आणि मार्क वॉ (16 हजार 529) यांचा समावेश आहे.
एक धावानं डेव्हिड वार्नरचं शतक हुकलं
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरचं एका धावानं शतक हुकलं. तो 99 धावा करून बाद झाला. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं 35, ट्रॅव्हिस हेडनं 27 आणि मिचेल मार्शनं 26 धावा केल्या. श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने आणि जेफ्री वँडरसे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
नाणफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा संघ 49 षटकांत 258 धावांत गारद झाला. असलंकानं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्याच्याशिवाय धनंजय डी सिल्वानं 60 आणि वानिंदू हसरंगानं 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श, पॅट कमिन्स, मॅथ्यू कुहेनमन यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-