IND vs NZ : चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंचं कमाल प्रदर्शन, अय्यरसह साहाची संयमी अर्धशतकं, न्यूझीलंडला विजयासाठी 280 धावांची गरज
कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलं. श्रेयस आणि साहा यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत अर्धशतकं झळवाली. आता सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 280 धावांची गरज आहे.
कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवशीचा खेळ नुकताच संपला आहे. आज काही भारतीय खेळाडूने दर्जेदार खेळाचं दर्शन घडवलं. ज्यामुळे भारताने आधी 234 धावांवर डाव घोषित करत न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान दिलं. ज्यानंतर अखेरच्या काही षटकात एक विकेटही टीपला असल्याने आता न्यूझीलंडला 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे.
Stumps on day four in Kanpur 🏏
🇮🇳 or 🇳🇿, who are you backing to clinch a victory on the final day? #WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/iLHiwrlhch
">
चौथ्या दिवशी एकीकडे सुरुवातीपासून भारताचे एकापाठी एक खेळाडू तंबूत परतत असताना या कसोटीचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरने अनुभवी आर आश्विनसोबत डाव सांभाळला. आश्विनने महत्त्वपूर्ण 32 धावा केल्यानंतर तो बाद झाला. नंतर अय्यरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण तोही 65 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर शेवटच्या फळीतील रिद्धिमान साहा (नाबाद 61) आणि अक्षर पटेल (नाबाद 28) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यानंतर अखेर भारताने 234 धावा झाल्यानंतर डाव घोषित करत किवींना विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. ज्यानंतर गोलंदाजी करताना आश्विनने तिसऱ्याच षटकात सलामीवीर विल यंगला पायचीत करत दिवस अखेर न्यूझीलंडची अवस्था 4 वर एक बाद अशी केली आहे. आता पाचव्या दिवशी किवींना विजयासाठी 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे.
अय्यर पुन्हा चमकला, साहानेही सावरलं
दिवसाच्या सुरुवातीपासून भारताचे फलंदाज एक एक करुन तंबूत परतत होते. पण त्याचवेळी पहिल्या डावात सलामीच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या श्रेयसने संघाची जबाबदारी घेत एक उत्तम खेळी खेळला. त्याला आश्विननेही 32 धावांची चांगली साथ दिली. अय्यरने आज 125 चेंडूत 65 धावा केल्या. एकाच सामन्यात दोन शतकं ठोकण्यापासून तो 35 धावांनी हुकला. तर दुसरीकडे मानेच्या दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणापासून लांब राहिलेल्या रिद्धिमान साहानेही 126 चेंडूत 61 धावा करत संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं.
संबधित बातम्या
- IND vs NZ : श्रेयस अय्यरचं पदार्पणातच शतक, कर्णधारांची काळजी मात्र वाढली, नेमकं कारण काय?
- Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबाबत चेतेश्वर पुजाराचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?
- IND vs NZ : भारतीय संघाला यष्टीरक्षकाचा नवा पर्याय, टी20 नंतर कसोटीमध्येही कमाल कामगिरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha