मोठी बातमी: तलाठी, कोतवाल अन् पोलीस पाटलांनी पूरग्रस्तांना मिळालेल्या आर्थिक मदतीचे पैसे हडपले, भंडाऱ्यातील खळबळजनक घटना
या सहा शेतकऱ्यांसह आणखी किती शेतकऱ्यांनी पूरपरिस्थितीचा फटका बसल्याचा बनाम करून राज्य सरकारला चुना लावलाय.

Bhandara: तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटलांनीच पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचे पैसे हडपल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातून समोर आलाय. खोटे पंचनामे करून पूरपीडितांची रक्कम उचचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमधला दुवा म्हणून काम करणाऱ्या प्रशासनातीलच महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनी हा प्रकार केल्यानं कुंपणानेच शेत खाल्याचं समोर येतंय. त्यामुळे यात पंचनामे करणारे तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटलांवर काय कारवाई करणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Bhandara News)
नक्की प्रकरण काय?
सप्टेंबर 2024 मध्ये आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा लाभ उचलण्यासाठी सहा शेतकऱ्यांनी तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीनं बनावट पंचनामे तयार करून राज्य सरकारकडून मिळणारी पूरग्रस्तांचा आर्थिक मोबदला उचलला. हा धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल या गावात उघडकीस आला आहे. ही धक्कादायक बाब गावातीलचं काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून समोर आलाय. पूरग्रस्ताची ही मदत उचलण्यासाठी या सहा शेतकऱ्यांनी पंचनामे करणाऱ्या पथकाला त्यांची शेती त्यांच्या पत्नीच्या नावानं असल्याची या पंचनाम्यात नोंद केली, आणि ती रक्कम डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात वळती करून उचल केली.
या सहा शेतकऱ्यांसह आणखी किती शेतकऱ्यांनी पूरपरिस्थितीचा फटका बसल्याचा बनाम करून राज्य सरकारला चुना लावलाय.याची सखोल चौकशी आता करणे गरजेचे झालीय. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले यांनी फेर चौकशी केली असता त्यात ही बाब सत्य असल्याचं उघडकीस आलीय. याचा संपूर्ण चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांकडं सादर करणार असल्याची माहिती तुमसरचे तहसीलदार यांनी दिलीय. आता या प्रकरणात तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्यासह आणखी कोण कोण सहभागी आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
विद्युत पुरवठ्याअभावी धान पीक संकटात
शेतात मोटारपंप असूनही नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान पीक (Paddy Crop) करपल्याची विदारक परिस्थिती गोंदियाच्या मोहगाव तिल्ली येथे निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातही रब्बी धानाची 10 हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील रोवणी आटोपली असून, धानाला पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कृषिपंपाद्वारे पाणी करून पीक घेतात. पण कृषिपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्यात कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, तर कधी कमी विद्युत दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीला सिंचन करणे कठीण झाले आहे.
हेही पहा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

