एक्स्प्लोर

Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबाबत चेतेश्वर पुजाराचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला? 

Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेनं 2019 पासून भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले आहेत. यात सात अर्धशतक आणि तीन शतकांचा समावेश आहे.

Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूर येथे खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी उपकर्णधार चेतेश्वर पुजारानं पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पुजारानं आपण लवकरच शतक झळकावणार असल्याचं म्हटलंय. त्यावेळी त्यानं भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेचंही समर्थन केलंय. राहाणे एक उत्कृष्ट खेळाडू आहे. रहाणे त्याचा फॉर्म परत मिळवण्यापासून केवळ एक डाव दूर असल्याचं पुजारानं म्हंटलंय. 

पुजारानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याला शतकाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी पुजारा म्हणाला की, "मी 50-60 धावा करत आहे. जोपर्यंत मी असा खेळत आहे, तोपर्यंत काळजी करण्यासारखं काही नाही. मी लवकरच शतक झळकवणार आहे, असा इशाराही त्यानं न्यूझीलंडच्या संघाला दिलाय. त्यानं अजिंक्य रहाणेबाबतही हेच सांगितलं. रहाणे हा मोठा खेळाडू आहे. काही वेळा खेळाडूला वाईट फॉर्मचा सामना करावा लागतो. रहाणे त्याच्या फॉर्मपासून फक्त एक डाव दूर आहे. तो सध्या चांगल्या स्थितीत आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत तो चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे, असा विश्वास पुजारानं व्यक्त केलाय. 

अजिंक्य रहाणेनं 2019 पासून भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले आहेत. यात सात अर्धशतक आणि तीन शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. 

भारताचा कसोटी संघ:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 3rd ODI Live : हॅमिल्टनमध्ये पावसाचा जोर कायम; मैदानावर पुन्हा कव्हर्स, प्रेक्षकही छत्री घेऊन बसले, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd ODI Live : हॅमिल्टनमध्ये पावसाचा जोर कायम; मैदानावर पुन्हा कव्हर्स, प्रेक्षकही छत्री घेऊन बसले, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! तब्बल 3 तास उशिराने टॉस झाला अन् अचानक मैदानावर सन्नाटा... किती वाजता सुरू होणार तिसरा ODI सामना?
IND vs NZ सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! तब्बल 3 तास उशिराने टॉस झाला अन् अचानक मैदानावर सन्नाटा... किती वाजता सुरू होणार तिसरा ODI सामना?
NZ A vs IND A : अरे देवा! पावसाने टीम इंडियाचा खेळच बिघडवला; बुमराहला एकही चेंडू टाकता आला नाही, नेमकं काय घडलं?
अरे देवा! पावसाने टीम इंडियाचा खेळच बिघडवला; बुमराहला एकही चेंडू टाकता आला नाही, नेमकं काय घडलं?
Team India Squad VS South Africa Tour : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी BCCI चा मोठा निर्णय; एकाच वेळी 3 संघ जाहीर, स्मृती मानधनाकडे मोठी जबाबदारी, कोण IN तर कोण OUT?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी BCCI चा मोठा निर्णय; एकाच वेळी 3 संघ जाहीर, स्मृती मानधनाकडे मोठी जबाबदारी, कोण IN तर कोण OUT?

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Embed widget