Asian Para Games 2023 : आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची 'शंभर नंबरी' कामगिरी, एकूण 111 पदकांची कमाई
Asian Para Games 2023 : आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारताने 'शंभर नंबरी' कामगिरी केली आहे. आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 111 पदकांची कमाई केली आहे.
Asian Para Games 2023 : चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा खेळ 2023 (Asian Para Games 2023) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. एशियन पॅरा गेम्स स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत शंभर नंबरी कामगिरी केली आहे. आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 111 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 29 सुवर्णपदकं, 31 रौप्यपदकं आणि 51 कांस्यपदकांचा समावेश आहे.
आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी
भारताने स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी चार सुवर्णपदके, दोन रौप्यपदके आणि सहा कांस्य पदकांसह 12 पदके जिंकली. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पहिल्यांदाच 100 पदकांचा टप्पा गाठला आहे. ही भारताची आशियाई पॅरा गेम्समधील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वीची 2018 मध्ये भारताने 72 पदके जिंकली होती, ज्यामध्ये जेव्हा 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश होता.
पॅराअॅथलिट्सची शंभर नंबरी कामगिरी
या उल्लेखनीय कामगिरीसह, भारतीय पॅरा-अॅथलीट्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुदृढ शरीराच्या खेळाडूंच्या यशाला तोडीस तोड 100 पदकांचा टप्पा गाठला. आशियाई खेळ 2023 सर्प्धेत भारताने विक्रमी 107 पदके जिंकली आहे.
100 MEDALS at the Asian Para Games! A moment of unparalleled joy. This success is a result of the sheer talent, hard work, and determination of our athletes.
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2023
This remarkable milestone fills our hearts with immense pride. I extend my deepest appreciation and gratitude to our… pic.twitter.com/UYQD0F9veM
पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा गेम्स 2023 मधील भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरीचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, 'एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी 100 हून अधिक पदकं जिंकण्याचा विक्र केला आहे, ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. हे यश आपल्या खेळाडूंची प्रतिभा, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय याचाच परिणाम आहे. हा उल्लेखनीय मैलाचा दगड भारतीयांच्या अंतःकरणात अपार अभिमानाने भरलेला आहे. मी याबद्दल खेळाडूंचे मनापासून कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करतो.'
आशियाई पॅरा गेम्स 2023 भारतीय पदक विजेत्यांची यादी
- अंकुर धामा - ऍथलेटिक्स पुरुष 5000 मीटर धावणे-T11 सुवर्ण
- निषाद कुमार - ऍथलेटिक्स पुरुष उंच उडी -T47 सुवर्ण
- राम पाल - ऍथलेटिक्स पुरुष उंच उडी-T47 रौप्य
- शैलेश कुमार - ऍथलेटिक्स पुरुष उंच उडी-T63 सुवर्ण
- मरियप्पन थांगावेलू - ऍथलेटिक्स पुरुष उंच उडी-T63 रौप्य
- मोनू घंगास - ऍथलेटिक्स पुरुष शॉट पुट-F11 कांस्य
- प्रणव सूरमा - ऍथलेटिक्स पुरुष क्लब थ्रो-F51 सुवर्ण
- धरमबीर - ऍथलेटिक्स पुरुष क्लब थ्रो-F51 रौप्य
- अमित कुमार - ऍथलेटिक्स पुरुष क्लब थ्रो-F51 कांस्य
- प्राची यादव - डोंगी महिला VL2 रौप्य
- कपिल परमार - ज्युडो पुरुष -60 किलो J1 रौप्य
- कोकिला - ज्युडो महिला - 48 किलो J2 कांस्य
- अवनी लेखरा - नेमबाजी महिला 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 सुवर्ण
- रुद्रांश खंडेलवाल - नेमबाजी मिश्र 50 मीटर पिस्तूल एसएच1 रौप्य
- अरुणा तायक्वांदो - महिला K44 -47 किलो कांस्य
- प्रवीण कुमार - ऍथलेटिक्स पुरुष उंच उडी-T64 सुवर्ण
- उन्नी रेणू - ऍथलेटिक्स पुरुष उंच उडी-T64 कांस्य
- एकता भय - ऍथलेटिक्स महिला क्लब थ्रो-F32/51 कांस्य
- सिमरन - ऍथलेटिक्स महिला 100 मीटर-T12 रौप्य
- दीप्ती जीवनजी - ऍथलेटिक्स महिला 400 मीटर-T20 सुवर्ण
- अजय कुमार - ऍथलेटिक्स पुरुष 400 मी-T64 रौप्य
- मनीष कौरव - डोंगी पुरुष KL3 कांस्य
- प्राची यादव - डोंगी महिला KL2 सुवर्ण
- गजेंद्र सिंग - कॅनोई पुरुष VL2 कांस्य
- नीरज यादव - ऍथलेटिक्स पुरुष डिस्कस थ्रो-F54/55/56 सुवर्ण
- योगेश कथुनिया - ऍथलेटिक्स पुरुष डिस्कस थ्रो-F54/55/56 रौप्य
- मुथुराजा - ऍथलेटिक्स पुरुष डिस्कस थ्रो-F54/55/56 कांस्य
- रवी रोंगाली - ऍथलेटिक्स पुरुष शॉट पुट-F40 रौप्य
- प्रमोद - ऍथलेटिक्स पुरुष 1500 मी-T46 रौप्य
- राकेश भैरा - ऍथलेटिक्स पुरुष 1500 मी-T46 कांस्य
- अशोक - पॉवरलिफ्टिंग पुरुष -65 किलो कांस्य
- रुद्रांश खंडेलवाल - नेमबाजी पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल SH1 रौप्य
- मनीष नरवाल - नेमबाजी पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल SH1 कांस्य
- रुबिना फ्रान्सिस - नेमबाजी महिला 10 मीटर एअर पिस्तूल SH1 कांस्य
- टीम इंडिया तिरंदाजी पुरुष दुहेरी रिकर्व - ओपन कांस्य
- टीम इंडिया - तिरंदाजी महिला दुहेरी कंपाऊंड - ओपन रौप्य
- टीम इंडिया - तिरंदाजी पुरुष दुहेरी कंपाऊंड - ओपन रौप्य
- पूजा ऍथलेटिक्स - महिला डिस्कस थ्रो-F54/55 रौप्य
- सुमित - ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक-F64 सुवर्ण
- पुष्पेंद्र सिंह - ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक-F64 कांस्य
- हॅनी - ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक-F37/38 सुवर्ण
- नारायण ठाकूर - ऍथलेटिक्स पुरुष 200 मीटर-T35 कांस्य
- श्रेयांश त्रिवेदी - ऍथलेटिक्स पुरुष 200 मीटर-T37 कांस्य
- सोमण राणा - ऍथलेटिक्स पुरुष शॉट पुट-F57 रौप्य
- होकाटो सेमा होतोझे - ऍथलेटिक्स पुरुष शॉट पुट-F57 कांस्य
- सुंदर सिंग गुर्जर - ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक-F46 सुवर्ण
- रिंकू ऍथलेटिक्स - पुरुष भालाफेक-F46 रौप्य
- अजित सिंग - ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक-F46 कांस्य
- अंकुर ढाका - ऍथलेटिक्स पुरुष 1500 मी-T11 सुवर्ण
- रक्षिता राजू - ऍथलेटिक्स महिला १५०० मी-टी११ सुवर्ण
- ललिता किल्लाका - ऍथलेटिक्स महिला 1500 मी-टी11 रौप्य
- शरथ मकनहल्ली - ऍथलेटिक्स पुरुष 1500 मी-T13 रौप्य
- बलवंत सिंग रावत - ऍथलेटिक्स पुरुष 1500 मी-टी13 कांस्य
- निमिषा सुरेश - ऍथलेटिक्स महिला लांब उडी-T47 सुवर्ण
- प्रमोद भगत, मनीषा रामदास - बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 कांस्य
- मानसी जोशी - बॅडमिंटन महिला एकेरी SL3 कांस्य
- शिवराजन सोलाईमलाई, नित्या श्री सुमथी सिवन - बॅडमिंटन मिश्र दुहेरी SH6 कांस्य
- नितेश कुमार, तुलसीमाथी मुरुगेसन - बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 कांस्य
- मनदीप कौर - बॅडमिंटन महिला एकेरी SL3 कांस्य
- वैष्णवी पुणेणी - बॅडमिंटन महिला एकेरी SL4 कांस्य
- झैनाब खातून - पॉवरलिफ्टिंग महिला -६१ किलो रौप्य
- कुमारी राज - पॉवरलिफ्टिंग महिला -६१ किलो कांस्य
- भाविना पटेल - टेबल टेनिस महिला एकेरी - वर्ग 4 कांस्य
- संदीप डांगी - टेबल टेनिस पुरुष एकेरी - वर्ग 1 कांस्य
- आदिल मोहम्मद नजीर अन्सारी, नवीन दलाल - तिरंदाजी पुरुष दुहेरी - W1 ओपन कांस्य
- शीतल देवी, राकेश कुमार - तिरंदाजी मिश्र सांघिक कंपाऊंड - ओपन गोल्ड
- नारायण ठाकूर - ऍथलेटिक्स पुरुष 100 मीटर-T35 कांस्य
- सचिन सर्जेराव खिलारी - ऍथलेटिक्स पुरुष शॉट पुट-F46 सुवर्ण
- रोहित कुमार - ऍथलेटिक्स पुरुष शॉट पुट-F46 कांस्य
- श्रेयांश त्रिवेदी - ऍथलेटिक्स पुरुष 100 मी-T37 कांस्य
- भाग्यश्री जाधव माधवराव - ऍथलेटिक्स महिला शॉट पुट-F34 रौप्य
- मोनू घंगास - ऍथलेटिक्स पुरुष डिस्कस थ्रो-F11 रौप्य
- सिमरन - ऍथलेटिक्स महिला 200 मीटर-T12 रौप्य
- मनीषा रामदास - बॅडमिंटन महिला एकेरी SU5 कांस्य
- नित्या श्री सुमथी सिवन - बॅडमिंटन महिला एकेरी SH6 कांस्य
- प्रमोद भगत, सुकांत इंदुकांत कदम - बॅडमिंटन पुरुष दुहेरी SL3-SL4 कांस्य
- सुकांत इंदुकांत कदम - बॅडमिंटन पुरुष एकेरी SL4 कांस्य
- कृष्णा नगर, शिवराजन सोलाईमलाई - बॅडमिंटन पुरुष दुहेरी SH6 कांस्य
- हिमांशी भावेशकुमार राठी - बुद्धिबळ महिला वैयक्तिक मानक VI-B1 कांस्य
- मनदीप कौर, मनीषा रामदास - बॅडमिंटन महिला दुहेरी SL3-SU5 कांस्य
- नित्या श्री सुमथी सिवन, रचना शैलेशकुमार पटेल - बॅडमिंटन महिला दुहेरी SH6 कांस्य
- सिद्धार्थ बाबू शूटिंग R6, मिश्रित 50मी - रायफल प्रोन SH1 गोल्ड
- राकेश कुमार - तिरंदाजी पुरुष वैयक्तिक कंपाऊंड - ओपन रौप्य
- शीतल देवी - तिरंदाजी महिला वैयक्तिक कंपाऊंड - ओपन गोल्ड
- रमन शर्मा - ऍथलेटिक्स पुरुष 1500 मी-T38 सुवर्ण
- सोलैराज धर्मराज - ऍथलेटिक्स पुरुष