सर्क्युलेशन नावाच्या मासिकामध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. सर्वप्रथम साल 2004 ते 2008 दरम्यान केरोसिन, डिझेल आणि गॅसमुळे होणाऱ्या प्रदुषणाचं निरीक्षण करण्यात आलं होतं.
2/8
ज्या घरात इंधनमुक्त वातावरण आहे, अशा घरात हृदय रोगामुळे मृत्यूचा धोका 6 टक्क्यांनी कमी होतो.
3/8
हृदय रोगामुळे मृत्यूचा धोका 11 टक्के आहे, तर रक्तस्त्रावामुळे मृत्यूचा धोका 14 टक्के आहे.
4/8
डिझेल किंवा केरोसिनच्या वासामध्ये ज्यांचा जास्त सहवास असतो, अशांचा मृत्यू विविध रोगांमुळ होण्याचं प्रमाण 6 टक्के आहे, असं या संशोधनात म्हटलं आहे.
5/8
घरात केरोसिन किंवा डिझेल जास्त वेळ राहिल्यास, किंवा वापर झाल्यास हृदय विकाराचा झटका येतो, ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो, असं अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधक सुमित मित्तर यांनी सांगितलं.
6/8
जगातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या गरिबीमध्ये जगत आहे. जी वीजेच्या अभावामुळे उजेडासाठी, स्वयंपाक करण्यासाठी केरोसिनचा वापर करते. त्यामुळं घरात प्रदुषण वाढतं, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WFO ने सांगितलं आहे.
7/8
केरोसिनचा वापर किंवा स्वयंपाक बनवतानाचा धूर घरात जास्त वेळ राहिल्यास हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता असते, असं एका संशोधनात समोर आलं आहे.
8/8
मानसिक त्रास किंवा इतर शारिरीक अस्वास्थ्य हे हृदय विकाराचा झटका येण्यामागचं कारण आहे, असं आजपर्यंत माहित होतं. मात्र हृदय विकाराचं खरं कारण घरातच लपलं असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.