एक्स्प्लोर
Rohit Sharma Birthday : रोहितचा असाही विक्रम, 'हिटमॅन'च्या आसपासही नाही दुसरा खेळाडू
Rohit Sharma Birthday : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस आहे. 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर येथे रोहित शर्माचा जन्म झाला.

Rohit Sharma Birthday Hitman Record
1/8

रोहित शर्मा सध्या टीम इंडियाच्या तिन्ही संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात यंदा मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
2/8

गुणतालिकेत मुंबईचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईला सात सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागलाय. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने आयपीएलचा चषक चारवेळा उंचावलाय.
3/8

त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतक झळकावलेय.
4/8

रोहित शर्मा याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 मध्येच संधी मिळाली. पण सुरुवातीच्या काळात रोहित शर्मा याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मध्यक्रमला फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला संघात स्थान टिकवता आले नव्हते.
5/8

रोहित शर्मा 2013 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पहिल्यांदा सलामीला उतरला होता. त्यानंतर रोहित शर्माने मागे वळून पाहिलेच नाही.
6/8

रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू आहे.
7/8

सलामीला संधी मिळाल्यानंतर रोहित शर्मा याच्या कामगिरीत सातत्य आले. रोहित शर्मा याने धावांचा पाऊस पाडला. सलामीला फलंदाजी करताना रोहित शर्मा याने वनडे मध्ये तीन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
8/8

रोहित शर्माने अनेक मुलाखतीत त्यासाठी धोनीच्या नावाचा उल्लेख केला आहे. धोनीने सलामीला पाठवल्यामुळेच खेळात सातत्य आल्याचे सांगण्यात येते.
Published at : 30 Apr 2023 10:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
बीड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
