Prashant Koratkar Rolls Royce Car: प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस कार कलाटेंच्या फॉर्महाऊसवर कशी? एबीपी माझाकडे कोरटकर अन् कलाटेंचा एकत्रित व्हिडीओ
Prashant Koratkar Rolls Royce Car: तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर ही गाडी असल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडीओजमधून दिसून येतं आहे. WB-02-AB 123 या क्रमांकांच्या या रोल्स रॉईससोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील आहेत.

पुणे: महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरुन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टाने काल (शुक्रवारी) कोरटकरला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोठडीमध्ये पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडे असलेल्या रोल्स रॉईस कारबद्दल मात्र कोरटकर काहीही माहिती द्यायला तयार नाही. एवढी महागडी गाडी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. प्रशांत कोरटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रोल्सरॉईस गाडीचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या गाडीची माहिती एबीपी माझाने शोधून काढली आहे. पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉईस गाडी असल्याचं समोर आलं आहे. तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर ही गाडी असल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडीओजमधून दिसून येतं आहे. WB-02-AB 123 या क्रमांकांच्या या रोल्स रॉईससोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील आहेत.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडीओ देखील एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येतो आहे. मनोहर भोसलेंवर याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉईस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का? हा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण ही रोल्स रॉईस चार हजार सातशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे. पोलीस तपासात कोरटकर या गाडीबाबत पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करतोय. मात्र, आता या गाडीचं गूढ एबीपी माझाने उलगडलं आहे. ही रोल्स रॉईस कार तुषार कलाटे यांच्याकडे आहे अशी माहिती आहे.
- लाखो गुंतवणूकदारांची 4700 कोटींना फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारला 2015मध्ये अटक
- मोतेवारच्या हजारो कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होऊन गुंतवणूकदारांना पैसे वाटणं होतं अपेक्षित
- लिलावाची जबाबदारी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनीच मालमत्ता लुबाडल्याचा आरोप
- सात ते आठ कोटींची रोल्सरॉईस ताब्यात घेऊन लिलाव झालाच नाही
- रोल्सरॉईस विकता येणार नाही असं सीबीआय, सीआयडीची 2015 मध्ये नोटीस
- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधांतून कोरटकरने नोटीस मागे घ्यायला लावली
- गाडीवर कर्ज दाखवत बँकेमार्फत लिलाव घडवला
- कोरटकरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधांतून गाडी कलाटेंनी 2 कोटींना केली रोल्सरॉईस खरेदी
- त्यानंतर पुण्यात रेंजहिल्स भागात कोरटकरने रोल्सरॉईस चालवली, व्हिडीओ शूट केला
- रोल्सरॉईस सापडत नसल्याचा दावा सीआयडीचे अधिकारी माझाशी बोलताना करतायत
- रोल्सरॉईसच्या तपासासाठी सीआयडीचं कोल्हापूर पोलिसांना पत्र
- कोरटकरने पोलिसांना माहिती देण्यास नकार दिल्यावर सीआयडीचे पुन्हा कानावर हात
- अखेर माझाने उलगडलं रोल्सरॉईसचं गूढ























