एक्स्प्लोर
Chhattisgarh: पोलीस नक्षलवाद्यांची मोठी चकमक, 17 नक्षलवाद्यांना कंठस्नान, नक्षल नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता, Photos
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 17 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
Naxal Encounter
1/7

छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंत या कारवाईमध्ये 17 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
2/7

पुढे आलेल्या माहितीनुसार, या चकमकीमध्ये नक्षल कमांडर जगदीशचाही खात्मा झाल्याचे पुढे आले आहे. 17 ही ठार नक्षलवाद्यांचे मृतदेह सुकमा पोलीस मुख्यालयात आणले जात आहे.
3/7

तर दुसऱ्या घटनेत बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोडगा गाव परिसरात नक्षलवाद्यांकडून प्रेशर आयडी ब्लास्ट करण्यात आला आहे.
4/7

सुरक्षा दलाला लक्ष करीत लावलेल्या प्रेशर आयडी बॉम्बवर पाय पडल्याने मोहफूल वेचायला गेलेली एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
5/7

या भीषण स्फोटात महिलेचे दोन पाय आणि एक हात निकामी झाल्याचे कळतंय. तर जखमी महिलेला जगदलपूरच्या रुग्णालयात हलविले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे ही बोलले जात आहे.
6/7

2023- 24 या वर्षात सुद्धा नक्षलवाद्यांच्या आयडी ब्लास्ट मध्ये दोन बालकांचा मृत्यू झाला होता.
7/7

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, यात इंसास आणि SLR सारखी हत्यारे असल्याने ठार झालेल्यांमध्ये काही महत्त्वाच्या नक्षल नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published at : 29 Mar 2025 11:27 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























