एक्स्प्लोर

Jallianwala Bagh massacre : हा आमच्या साम्राज्यावर लागलेला डाग! जालियनवाला बाग हत्याकांडावर सरकारने भारताची माफी मागावी; ब्रिटीश खासदाराची संसदेत मागणी

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आजपर्यंत एकाही ब्रिटिश पंतप्रधानाने माफी मागितलेली नाही. मात्र, याबाबत अनेक ब्रिटिश नेत्यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली असली तरी अधिकृत माफी मागितलेली नाही.

Jallianwala Bagh massacre : ब्रिटनमधील विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश सरकारने 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडासाठी औपचारिकपणे भारतातील जनतेची माफी मागावी असे सांगितले आहे. त्यांनी गुरुवारी संसदेत सांगितले की, ब्रिटिश सरकारने 13 एप्रिलपूर्वी माफी मागावी. पुढील महिन्यात जालियनवाला बाग हत्याकांडाचा 106 वा स्मृतीदिन आहे. ब्रिटनचे खासदार ब्लॅकमन यांनीही त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्रिटिश साम्राज्याला लागलेला डाग

ब्लॅकमन आपल्या भाषणात म्हणाले की, बैसाखीच्या दिवशी अनेक लोक शांततेने आपल्या कुटुंबियांसह जालियनवाला बागेत सामील झाले होते. जनरल डायरने ब्रिटीश सैन्याच्या वतीने आपले सैनिक पाठवले आणि निष्पाप लोकांच्या गोळ्या संपेपर्यंत त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. खासदार ब्लॅकमन म्हणाले की, जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटिश साम्राज्याला लागलेला डाग आहे. यामध्ये 1500 लोकांचा मृत्यू झाला तर 1200 लोक जखमी झाले. सरतेशेवटी, ब्रिटिश साम्राज्यावरील या डागामुळे जनरल डायर कुप्रसिद्ध झाला.

ब्रिटनच्या एकाही पंतप्रधानाने अद्याप माफी मागितलेली नाही

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आजपर्यंत एकाही ब्रिटिश पंतप्रधानाने माफी मागितलेली नाही. मात्र, याबाबत अनेक ब्रिटिश नेत्यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली असली तरी अधिकृत माफी मागितलेली नाही. 2013 साली तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी 2013 मध्ये जालियनवाला बाग स्मारकाला भेट दिली होती. त्यांनी या हत्याकांडाला लज्जास्पद घटना म्हटले होते पण माफी मागितली नाही. यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी 10 एप्रिल 2019 रोजी या हत्याकांडाच्या 100 व्या स्मृतीदिनापूर्वी एक दिव आधी विधान केले. थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटीश-भारतीय इतिहासावरील सर्वात लज्जास्पद डाग असल्याचे वर्णन केले. त्यांनी खेदही व्यक्त केला, पण माफी मागितली नाही. 1997 मध्ये भारत दौऱ्यावर असताना ब्रिटीश राणी एलिझाबेथ यांनी हे दुःखद प्रकरण म्हटले होते.

खेद, पण ब्रिटिश नेते माफी का मागत नाहीत?

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटिश सरकारने अधिकृतपणे माफी मागितल्यास अनेक कायदेशीर आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. माफी मागितल्यास, पीडितांच्या कुटुंबीयांकडून नुकसान भरपाईची मागणी मजबूत होऊ शकते. ब्रिटनला असा आर्थिक भार टाळायचा आहे, कारण वसाहतवादी इतिहासात अशा अनेक घटना आहेत ज्यासाठी माफी मागितली जाऊ शकते.

रौलेट कायद्याचा निषेध करण्यासाठी लोक जालियनवाला बागेत आले

ब्रिटीश सरकारने भारतातील क्रांतिकारी कारवायांना आळा घालण्यासाठी रौलेट कायदा आणला होता. त्यात कोणत्याही खटल्याशिवाय नजरकैदेत ठेवणे आणि गुप्तपणे खटला चालवणे अशा तरतुदी होत्या. याबाबत भारतीय जनतेमध्ये संताप व्यक्त होत होता. याविरोधात जालियनवाला बागेत लोक जमले होते. या सभेत महिला, लहान मुले, वयोवृद्धही सहभागी झाले होते. ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरने आपल्या सैन्याला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचे आदेश दिले. या सैन्यात गोरखा आणि बलुच रेजिमेंटमधील सैनिकांचा समावेश होता, जे ब्रिटिश भारतीय सैन्याचा भाग होते.

ब्रिटिश सरकारच्या म्हणण्यानुसार या हत्याकांडात 379 लोक मारले गेले. मात्र, मृतांचा आकडा 1000 हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जालियनवाला बागेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. रस्ता अरुंद असल्याने लोक बाहेर पडू शकत नव्हते. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली, जिथे त्यांचे मृतदेह नंतर सापडले. हे करण्यामागे डायरचा उद्देश निशस्त्र लोकांमध्ये दहशत पसरवणे हा होता, जेणेकरून स्वातंत्र्याची मागणी दाबली जाऊ शकते. या हत्याकांडाने भारतभर संतापाची लाट उसळली. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचा 'नाईटहूड' सोडला आणि महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली. 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget