Satara Crime: थायलंडच्या बीचवर फुल मून पार्टी, समुद्रातील खडकावर 24 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार, साताऱ्यातील 'ते' दोन नराधम कोण?
Satara crime news: थायलंडच्या बीचवर जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडणारे साताऱ्यातील 'ते' दोन नराधम कोण? ओळख पटली. महत्त्वाची अपडेट. सातारकरांची मान शरमेने झुकली

सातारा: साताऱ्यातील दोन व्यक्तींनी थायलंडमध्ये जाऊन संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनी थायलंडच्या एका बीचवर 24 वर्षांच्या जर्मन तरुणीवर बलात्कार (Rape on german Girl) केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी थायलंड पोलिसांनी (Thailand Police) दोघांनाही अटक करुन तुरुंगात डांबले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. सातारकरांना (Satara Crime News) शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या या दोघांची नावे समोर आली आहे. विजय दादासाहेब घोरपडे (वय 47) आणि राहुल बाळासाहेब भोईटे (वय 40) अशी या नराधमांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, 14 मार्चला थायलंडच्या रिन बीचवर फुल मून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी ही जर्मन तरुणी तिच्या मित्रासोबत आली होती. ही पार्टी पहाटेपर्यंत सुरु होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांनी या तरुणीला बीचवरील एका खडकावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर हे दोघेही कोह फांगन जिल्ह्यातील गाव क्रमांक 1 मधील बंगल्यावर निघून गेले. अत्याचार झाल्यानंतर जर्मन तरुणी शुद्धीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचा तपास सुरु केला.
कोह फांगन पोलीस स्टेशनच्या अधीक्षकांनी सुरुवातीला रीन बीचवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. जर्मन तरुणीने आरोप केल्याप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणावरुन पळून जाणाऱ्या दोन संशयित भारतीय पुरुषांची ओळख पटवली. हे दोन्ही भारतीय पुरुष रिन बीचवरुन कोह फांगनकडे मोटारसायकलने गेले. कोह फांगन जिल्ह्यातील गाव क्रमांक 1 मधील बंगल्यात राहिले. त्यानंतर 15 मार्च रोजी कोह फांगन पोलीस ठाण्यात या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परदेशी महिला शुद्धीवर नसल्यामुळे ओळख पटवता आली नव्हती. त्यानंतर या दोघांना निवासस्थानी परतण्याची परवानगी देण्यात आली होती.
16 मार्चला पीडित जर्मन तरुणी शुद्धीवर आली. यावेळी पोलिसांनी विजय घोरपडे आणि राहुल भोईटे या दोघांना परत चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यावेळी तरुणीने या दोघांची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी घोरपडे आणि भोईटे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. त्यावेळी विजय घोरपडे यांनी आपल्यावरील आरोप मान्य केले. तर राहुल भोईटे यांनी आरोप नाकारले. परंतु, पिडीतेला मिठी मारल्याचे आणि तिचे चुंबन घेतल्याचे कबूल केले. पण पीडितेने प्रतिकार केला म्हणून आम्ही तिच्यावर बलात्कार केला नाही, असा दावा राहुल भोईटे यांनी केला. यानंतर पोलिसांनी हिंसेचा वापर करुन बलात्कार केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल केला. संबंधित पीडित तरुणी येत्या काही दिवसांत जर्मनीला परतणार आहे. त्यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थायलंड पोलिसांनी सध्या विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांना तुरुंगात डांबले आहे.
आणखी वाचा























