लातूर पालिकेच्या व्यापारी संकुलातील 32 गाळे सील, तहसील कार्यालयाची कारवाई, 2 कोटी 36 लाख रुपयांचा अकृषी कर थकवला
लातूरच्या (Latur) तहसील कार्यालयाने महापालिकेच्या व्यापारी संकुलातील 32 गाळे सील केले आहेत. लातूर महापालिकेकडे (Latur Mahapalika) 2 कोटी 36 लाख रुपयांचा अकृषी कर थकल्याने आज कारवाई केली आहे.
लातूर : लातूरच्या (Latur) तहसील कार्यालयाने महापालिकेच्या व्यापारी संकुलातील 32 गाळे सील केले आहेत. लातूर महापालिकेकडे (Latur Mahapalika) 2 कोटी 36 लाख रुपयांचा अकृषी कर थकल्याने आज कारवाई केली आहे. रकमेचा भरणा न केल्यास महापालिकेचे कार्यालय सील करण्याचा इशारा देखील तहसील कार्यालयानं दिला आहे.
2 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी
लातूर महापालिकेकडे गेल्या वर्षीची आणि यंदाची चालू बाकी मिळून सुमारे 2 कोटी 36 लाख रुपये इतकी अकृषी कराची थकबाकी आहे. नोटीसा देऊनही महापालिकेने अद्याप कराच्या रकमेचा भरणा न केल्यामुळं लातूरच्या तहसील कार्यालयाने आज सकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे सील केले आहेत. शहरातील अशोक हॉटेल चौकातील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील जवळपास 32 गाळे आणि संकुलातील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील प्रवेशद्वाराचे मुख्य गेट सील केले आहे. ही कारवाई करण्यासाठी स्वतः तहसीलदार कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह यावेळी हजर होते.
तीन वेळा नोटीसा देऊनही महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही
गेल्या जानेवारी महिन्यापासून महापालिकेला तीन वेळा नोटीसा देऊनही महापालिकेने तहसीलकडे अकृषी कराच्या थकीत रकमेचा भरणा केलेला नाही. दोन दिवसांपूर्वी आणखी एक नोटीस देऊन गाळे सील करण्याचा इशारा तहसील प्रशासनाने दिला होता. तरीही महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. थकीत रकमेचा भरणा न केल्यास येत्या काही दिवसात महापालिकेचे कार्यालय सील करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयानं वारवंरा लातूर महापालिकेला यासंदर्बात नोटीसा देखील दिल्या होत्या. मात्र, महापालिकेने याकडं दुर्लक्ष केल्याची माहिती तहसली प्रशासनाने दिली आहे. पालिकेने कोणत्याही प्रकराचा कर भरला नाही. त्यामुळं अखेर तहसील कार्यालयाला कारवाईचे हत्यार उपसावे लागले. महापालिकेचे तब्बल 32 गाळे सील करण्यात आले आहेत. जोपर्यंत महापालिकेच्या वतीनं थकलेला कर भरला जात नाही, तोपर्यंत सील केलेले गाळे उघडण्यात येणार नाहीत. त्यामुळं आता यावर लातूर महापालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे गेल्या वर्षीची देखील थकबाकी आहे. मागील वर्ष आणि यावर्षीची थकबाकी मिळून महापालिकेकडे एकूण सुमारे 2 कोटी 36 लाख रुपये इतकी थकबाकी आहे.
महत्वाच्या बातम्या:
शिर्डी विमानतळाला जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंट, थकबाकी वसुलीसाठी काकडी ग्रामपंचायतीकडून कारवाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
