एक्स्प्लोर
IPL 2023 : पीयूष चावला-वढेराची झुंज, चेन्नईचा मुंबईवर विजय
पीयूष चावलाचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही.
IPL 2023
1/7

चेन्नईने मुंबईचा सहा विकेटने पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईने दिलेले 140 धावांचे आव्हान चेन्नईने १४ चेंडू आणि सहा विकेट राखून सहज पार केले.
2/7

चेन्नईकडून कॉनवे याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. मुंबईच्या नेहाल वढेरा याची अर्धशतकी झुंज व्यर्थ गेली. चेन्नईने यंदा मुंबईचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. वानखेडे मैदानावर आणि चेपॉक स्टेडिअमवर चेन्नईने बाजी मारली आहे.
3/7

मुंबईने दिलेल्या १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी चार षटकात ४६ धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाड याने १६ चेंडूत ३० धावांचे योगदान दिलेय. यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले.
4/7

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि डेवेन कॉनवे यांनी डाव सावरला. अजिंक्य रहाणे याला चावलाने बाद केले. अजिंक्य रहाणे याने १७ चेंडूत २१ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
5/7

अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर अनुभवी अंबाती रायडूने कॉनवेला साथ दिली. पण स्टब्सच्या गोलंदाजीवर रायडू बाद झाला. अंबाती रायडूने ११ चेंडूत १२ धावांची खेळी केली. या खेळी त्याने एक षटकार लगावले. रायडू बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि डेवेन कॉनवे यांनी चेन्नईची धावसंख्या वाढवली.
6/7

अखेरीस मधवाल याने कॉनवेला बाद करत चेन्नईला चौथा धक्का दिला. डेवेन कॉनवे याने संयमी फलंदाजी करत चेन्नईची धावसंख्या हालती ठेवली. कॉनवेने ४२ चेंडूत चार चौकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. अखेरीस शिवम दुबे याने धोनीच्या साथीने चेन्नईला विजय मिळवून दिला. शिवम दुबे याने तीन षटकारांसह नाबाद २६ धावांची खेळी केली. धोनी दोन धावांवर नाबाद राहिला.
7/7

पीयूष चावलाचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. पीयूष चावलाने चार षटकार २५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. स्ट्रिस्टन स्टब्स आणि मधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबईच्या इतर गोलंदाजाला विकेट घेण्यात अपयश आले.
Published at : 06 May 2023 07:44 PM (IST)
Tags :
IPL 2023अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
