विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लोकांनी त्यांना भाड्याच्या खोलीत रंगेहाथ लैंगिक संबंध सुरु असताना पकडले होते. यानंतर दोघांना शरिया पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Indonesia : इंडोनेशियातील आचे राज्यात गुरुवारी समलैंगिक संबंधांच्या आरोपावरून दोन विद्यार्थ्यांना सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आले. इस्लामिक कायद्यांतर्गत काम करणाऱ्या न्यायालयाने त्याला लैंगिक संबंधांप्रकरणी दोषी ठरवले होते. दोन्ही आरोपी स्थानिक विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लोकांनी त्यांना भाड्याच्या खोलीत रंगेहाथ लैंगिक संबंध सुरु असताना पकडले होते. यानंतर दोघांना शरिया पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एएफपी न्यूजनुसार, दोन आरोपींना आचे राज्याची राजधानी बांदा आचे येथील एका उद्यानात सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आले. यामध्ये नात्याची सुरुवात करणाऱ्याला 82 फटके तर दुसऱ्याला 77 फटके देण्यात आले.
ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने याला द्वेषपूर्ण गुन्हा म्हटले आहे
हे लोक 3 महिने कोठडीत होते, हे पाहता या लोकांची शिक्षा तीन फटक्यांनी कमी करण्यात आली. इंडोनेशियातील इतर राज्यांप्रमाणे, आचेमध्ये समलैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. जेथे इस्लामिक कायदेशीर शरिया लागू आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या शिक्षेला समलैंगिक समुदायाविरुद्ध भेदभाव असल्याचे सांगत निषेध केला. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने या शिक्षेचे वर्णन द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून केले आहे. याच उद्यानात गुरुवारी ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी दोन पुरुषांना अनुक्रमे 34 आणि आठवेळा फटके मारण्यात आले.
आचे राज्यात 2014 पासून समलैंगिक संबंधांवर बंदी
इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. इंडोनेशियातील बहुतेक भागांमध्ये समलैंगिकता बेकायदेशीर नाही, परंतु सामान्यतः निषिद्ध मानले जाते. 2020 मधील प्यू रिसर्च सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 80 टक्के इंडोनेशियन लोकांना असे वाटते की समलैंगिकता समाजाने स्वीकारू नये. आचे हे इंडोनेशियातील एकमेव मुस्लिम राज्य आहे जे इस्लामिक कायद्याचे पालन करते. 2014 मध्ये येथे समलैंगिक संबंधांवर बंदी घालण्यात आली होती. सुमात्रा बेटाच्या उत्तरेकडील टोकावर असलेले हे राज्य चोरी, जुगार आणि व्यभिचार यांसारख्या गुन्ह्यांना फटके मारून शिक्षा देते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
