एक्स्प्लोर

Raj Thackeray Wrote Letter To Konkan Hearted Girl: 'कोकण हार्टेड गर्ल'च्या वडिलांना राज ठाकरेंचं पत्र, व्यक्त केली दिलगिरी; अंकिताची इन्स्टा पोस्ट चर्चेत

Raj Thackeray Wrote Letter To Konkan Hearted Girl: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लिहिलं 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकरच्या वडिलांना पत्र, व्यक्त केली दिलगिरी...

Raj Thackeray Wrote Letter To Konkan Hearted Girl: 'कोकण हार्टेड गर्ल' (Konkan Hearted Girl) म्हणजेच, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) 16 फेब्रुवारी रोजी तिनं संगीतकार कुणाल भगतसोबत (Kunal Bhagat) आपली लग्नगाठ बांधली. कोकणातच अगदी थाटामाटात अंकिताचा शाही विवाहसोहळा पार पडला. अंकिताच्या लग्नसोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये अंकितासोबत घरात असलेली बरी मंडळी उपस्थित होती. अंकितानं आपल्या लग्नाचं आमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही दिलं होतं. पण, राज ठाकरे मात्र या सोहळ्यासाठी अनुपस्थित होते. अशातच आता याचसंदर्भातलं एक पत्र अंकितानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. अंकिताला आलेलं हे पत्र स्वतः राज ठाकरेंनी लिहिलं आहे. 

अंकिता आणि कुणालनं आपल्या लग्नाचं आमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिलं होतं. पण, राज ठाकरे मात्र अंकिताच्या लग्नाला उपस्थित नव्हते. अशातच आता राज ठाकरेंनी अंकिताच्या वडिलांना पत्र लिहून यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, या पत्रातून राज ठाकरे यांनी अंकिताच्या लग्नाला उपस्थित न राहण्यामागचं कारणही सांगितलं आहे.

Raj Thackeray Wrote Letter To Konkan Hearted Girl: 'कोकण हार्टेड गर्ल'च्या वडिलांना राज ठाकरेंचं पत्र, व्यक्त केली दिलगिरी; अंकिताची इन्स्टा पोस्ट चर्चेत

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत राज ठाकरेंच्या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, पत्राचा फोटोही शेअर केला आहे.  राज ठाकरेंनी पत्रात लिहिलं आहे की, "आपली कन्या चि. सौ. कां अंकिता हिच्या शुभ विवाहाचे आपण अगत्यपूर्वक पाठविलेलं निमंत्रण मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. सदर मंगल सोहळ्यास उपस्थित राहण्यास निश्चित आनंद वाटला असता. परंतु पूर्वनियोजित दौऱ्यामुळे उपस्थित राहता येत नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्हा उभयतांकडून नव दांपत्यास शुभेच्छा. तसेच पुढील वैवाहिक आयुष्य सुखः समृद्धी व भरभराटीचे जावो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना. आपला नम्र, राज ठाकरे." 

अंकिता वालावलकरची लगीनघाई सुरू होती, त्यावेळी तिनं आपल्या लग्नाचं आमंत्रण सर्वात आधी गावदेवीला दिलं आणि त्यानंतर ती राज ठाकरेंना लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी पोहोचली होती. राज ठाकरे यांना सहकुटुंब आपल्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी अंकिता आणि कुणाल शीवतीर्थावर पोहोचले होते. अंकितानं राज ठाकरेंना लग्नाची पत्रिका देतानाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, राज ठाकरे काही कारणास्तव लग्नसोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. अशातच आता राज ठाकरे यांनी अंकिताच्या वडिलांना यासंदर्भात पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राची एक इन्स्टाग्राम स्टोरी अंकितानं शेअर केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

गोविंदा अन् सुनीता अहुजा घेणार 'ग्रे डिवोर्स'? आयुष्यातील बराच काळ एकत्र घालवल्यानंतर वेगळं होण्याचा ट्रेंड का वाढतोय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'मला बाळ हवंय, तू स्पर्म डोनेट कर..' राखीची राकेश बापटकडे अजब मागणी, म्हणाली 'माझं एकतर्फी प्रेम असलं तरी..'
'मला बाळ हवंय, तू स्पर्म डोनेट कर..' राखीची राकेश बापटकडे अजब मागणी, म्हणाली 'माझं एकतर्फी प्रेम असलं तरी..'
Arshdeep Singh Dating Rumours with Samreen Kaur:अर्शदीप सिंह करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? पंजाब किंग्जची मॅच संपताच स्टेडियमबाहेर पडली, प्रश्न विचारताच लाजत उत्तर दिलं, म्हणाली...
अर्शदीप सिंह करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? पंजाब किंग्जची मॅच संपताच स्टेडियमबाहेर पडली, प्रश्न विचारताच लाजत उत्तर दिलं, म्हणाली...
Actor Death: मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन, अभिनेत्रीकडून इमोशनल पोस्ट शेअर
मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन, अभिनेत्रीकडून इमोशनल पोस्ट शेअर
Dhurandhar 2 Box Office Collection: ‘धुरंधर 2’नं ते करून दाखवलं जे भल्याभल्यांना जमलं नाही; एका महिन्याचा कमाईचा आकडा किती?‘पुष्पा 2’च्या रेकॉर्डला गाठलं
‘धुरंधर 2’नं ते करून दाखवलं जे भल्याभल्यांना जमलं नाही; एका महिन्याचा कमाईचा आकडा किती?‘पुष्पा 2’च्या रेकॉर्डला गाठलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
Embed widget