एक्स्प्लोर
निसर्गाचं रौद्ररुप! महाराष्ट्रातील वादळाचं भीषण वास्तव दाखवणारे फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04155624/nisarga-cyclone01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![वादळामुळे उरण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या वादळाचा मुंबईवरील धोका टळला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04154157/nisarga-cyclone07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वादळामुळे उरण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या वादळाचा मुंबईवरील धोका टळला.
2/7
![चक्रीवादळाचा धोका पाहता मुंबई विमानतळही बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, संध्याकाळी 5 वाजल्यानंतर जेव्हा वादळ मुंबईतून पुढे गेलं, त्यानंतर विमानतळ सुरु करण्यात आलं आणि विमानांची उड्डाणं सुरु केली गेली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04154146/nisarga-cyclone06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चक्रीवादळाचा धोका पाहता मुंबई विमानतळही बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, संध्याकाळी 5 वाजल्यानंतर जेव्हा वादळ मुंबईतून पुढे गेलं, त्यानंतर विमानतळ सुरु करण्यात आलं आणि विमानांची उड्डाणं सुरु केली गेली.
3/7
![हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईहून 95 किलोमीटर दूर असलेल्या अलिबागकडे पोहोचण्याचा प्रवास साधारणतः दुपारी 12 वाजता सुरु झाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04154135/nisarga-cyclone05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईहून 95 किलोमीटर दूर असलेल्या अलिबागकडे पोहोचण्याचा प्रवास साधारणतः दुपारी 12 वाजता सुरु झाला होता.
4/7
![जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बोलताना सांगितले की, निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडपासून दूर 87 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीवर्धन आणि दिवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04154124/nisarga-cyclone04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बोलताना सांगितले की, निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडपासून दूर 87 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीवर्धन आणि दिवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालं आहे.
5/7
![रायगड जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळेच अनेक झाडं आणि विजेचे खांब पडले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04154113/nisarga-cyclone03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रायगड जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळेच अनेक झाडं आणि विजेचे खांब पडले होते.
6/7
![निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या अलिबागच्या किनाऱ्यावर धडक दिली. त्यामुळे अलिबागमध्ये याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद पाहायला मिळाले. जेव्हा हे चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं त्यावेळी याचा वेग 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका होता. यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारा होता की, अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी घरांची कौलं आणि पत्रे, विजांचे खांबही पडले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडीत झाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04154101/nisarga-cyclone02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या अलिबागच्या किनाऱ्यावर धडक दिली. त्यामुळे अलिबागमध्ये याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद पाहायला मिळाले. जेव्हा हे चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं त्यावेळी याचा वेग 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका होता. यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारा होता की, अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी घरांची कौलं आणि पत्रे, विजांचे खांबही पडले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडीत झाला होता.
7/7
![कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाने काल 3 जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडक दिली असून आता या वादळाने पुढचा प्रवास सुरु केला आहे. या वादळाने जिथून प्रवास केला त्या भागांमध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडत होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04154052/nisarga-cyclone01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाने काल 3 जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडक दिली असून आता या वादळाने पुढचा प्रवास सुरु केला आहे. या वादळाने जिथून प्रवास केला त्या भागांमध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडत होता.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)