एक्स्प्लोर
वर्ध्याच्या घोरड गावात केजाजी महाराजांचा पुण्यतीथी महोत्सव, डोळ्याचे पारण फेडणारा रिंगण सोहळा
विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तिर्थस्थळी दिंडीसोहळा देखील आयोजित करण्यात आला.

Wardha News
1/10

वर्ध्याच्या घोराड येथील संत केजाजी महाराज यांचा पुण्यतीथी महोत्सव साजरा करण्यात आला आहे.
2/10

यावेळी येथे आयोजित रिंगण पाहण्यासाठी अलोट गर्दी जमली होती.
3/10

विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तिर्थस्थळी दिंडीसोहळा देखील आयोजित करण्यात आला.
4/10

संत नामदेव महाराज समाधी मैदानावर करण्यात आलेल्या रिंगण सोहळ्यात अश्व, विणेकरी, मृदुंग वादक यांनी रिंगण करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
5/10

बोर नदी काठावर असलेले घोराड हे तिर्थस्थळ संत केजाजी महाराज आणि संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी मानली जाते
6/10

संत केजाजी महाराज यांची 116 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे
7/10

दिंडी गरुड, हनुमान मंदिराकडून बोर तिरावरील पुंडलीकांच्या भेटीला गेली.
8/10

मंदिराला प्रदक्षिणा करत असताना भाविकांकडून होत असलेला हरिनामाचा गजर पंढपुरातील चंद्रभागेच्या तिरावरची अनुभूती देत होता.
9/10

सर्व दिंड्या संत नामदेव महाराज समाधी मैदानावर पोहचताच या ठिकाणी दिंड्यांचा रिंगण सोहळा पार पडला.
10/10

डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पाहण्यासाठी विदर्भातील असंख्य भाविकांची उपस्थिती होती.
Published at : 23 Jan 2023 03:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
