एक्स्प्लोर

Prashant Koratkar: पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?

Prashant Koratkar probe: शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पोलीस कोठडीत पोपटासारखा बोलला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली? कोरटकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

कोल्हापूर: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याने पोलीस कोठडीतील चौकशीदरम्यान आपल्या कृत्याची कबुली दिली आहे. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता, असे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशांत कोरटकर हा तब्बल महिनाभर फरार होता. या काळात त्याने एक व्हिडीओ शेअर करुन आपण इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी दिल्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप फेटाळला होता. मात्र, आता त्याने इंद्रजीत सावंत यांना फोन केल्याची कबुली दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानकारक टिप्पणी केल्याचाही आरोप खरा ठरण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्रीनंतर पा तास केलेल्या चौकशीवेळी प्रशांत कोरटकरने महत्त्वाच्या आरोपांची कबुली दिली. तसेच मोबाईलमधील डेटाही स्वत:च डिलिट केल्याचे प्रशांत कोरटकर याने मान्य केले. अटक टाळण्यासाठी आपण हैदराबादमार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत होतो, असेही कोरटकर याने पोलिसांना सांगितले. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी कोरटकरच्या कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे पोलिसांकडून आज पुन्हा एकदा त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर उद्या त्याला कोर्टात हजर केले जाईल. तोपर्यंत पोलिसांच्या हाती आणखी कोणकोणती माहिती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने बुधवारी प्रशांत कोरटकर याच्या आवाजाचे नमुने घेतले. जवळपास तीन-चार तास ही प्रक्रिया समोर होती. त्याचा अहवाला येत्या चार-पाच दिवसांत येण्याची शक्यता आहे. इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यातील संभाषणाचे विश्लेषण फॉरेन्सिक टीमकडून केले जाईल. त्यासाठी इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाचेही नमुने पोलिसांकडून घेण्यात आले आहेत. 

कोल्हापूर पोलिसांकडून खास करुन रात्रीच्यावेळी प्रशांत कोरटकर याची चौकशी केली जात आहे. प्रशांत कोरटकर कुठे गेला होता, कोणाची मदत घेतली, कुठे किती दिवस राहिला, यादरम्यान कोणीकोणी मदत केली, असे प्रश्न पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला विचारले. प्रशांत कोरटकर हा तब्बल महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे त्याला खरोखरच पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांनी मदत केली होती का, हा पैलूही तपासला जात आहे.

आणखी वाचा

सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला

शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Embed widget