Uddhav Thackeray Special Report : विधानभवनाच्या दारात सरदेसाई-ठाकरेंमध्ये काय चर्चा?
Uddhav Thackeray Special Report : विधानभवनाच्या दारात सरदेसाई-ठाकरेंमध्ये काय चर्चा?
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून जोरदार चर्चा झाली. पुन्हा आरोप-प्रत्यारोप झाले. आणि त्यानंतर विधिमंडळाच्या आवारात असं काही घडलं की, एका ज्येष्ठ नेत्याच्या मुखातून आलेल्या अपशब्दाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. नेमकं काय घडलं, आपण तेही पाहूयात खास रिपोर्टमधून.
आता उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला आणि का म्हणाले?
याचं खरं उत्तर स्वतः उद्धव ठाकरे आणि वरूण सरदेसाईच देऊ शकतील...
मात्र या उत्तराचा शोध घेताना अनेकांनी बोट दाखवलं ते दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात झालेल्या वादळी चर्चेकडे...
दिशा सालियन मृत्यू प्रकरणानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं, सत्ताधारी आदित्य ठाकरेंना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही...
सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरून भाजपचे आमदार राम कदमांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला..






















