एक्स्प्लोर
mahalaxmi atta chakki sangli : सांगलीची महालक्ष्मी आटाचक्की चालली अमेरिकेला!
आतापर्यंत सांगलीचा भडंग , द्राक्षे, बेदाणा, हळद, वीणा परदेशात निर्यात झालेले आपण ऐकलं असेल, पण आता सांगलीमधून एक आटाचक्की थेट अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे.

mahalaxmi atta chakki sangli
1/13

आता सांगलीमधून एक आटाचक्की थेट अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे.
2/13

सांगलीत महालक्ष्मी आटाचक्की हा आटाचक्कीचा प्रसिद्ध ब्रँड असून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका ग्राहकाच्या आग्रहाखातर 22 किलो वजनाची आणि अर्धा एचपी पॉवरची महालक्ष्मी आटाचक्की डिझाईन करण्यात आली आहे.
3/13

ती आता मुंबई आणि पुढे विमानामार्गे अमेरिकेत जाईल.
4/13

साधारण 50 ते 70 किलोपर्यंतच्या आटाचक्कीचे आतापर्यंत महालक्ष्मी आटाचक्की समूहात उत्पादन केले जात होते.
5/13

अमेरिकाला आटाचक्की पाठवायची आहे हे लक्षात घेऊन आटाचक्कीच्या डिझाईन मध्ये बदल करत वजनात कमी करुन ते जवळपास 22 किलो इतके करून आटाचक्कीचे नवीन छोटे मॉडेल डिझाइन करण्यात आले.
6/13

न्यूयॉर्कमध्ये अजिंक्य सुरेश ससे वास्तव्यास आहेत. त्यांना घरीच धान्य दळणारी एक आटाचक्की हवी होती.
7/13

न्यूयॉर्कमध्ये अजिंक्य सुरेश ससे वास्तव्यास आहेत. त्यांना घरीच धान्य दळणारी एक आटाचक्की हवी होती.
8/13

. त्यांनी महालक्ष्मी आटाचक्की उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष माने यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत आटाचक्की पाठवण्याबाबत विचारणा केली.
9/13

सुभाष माने यांनी देखील आटाचक्की पाठवण्याबाबत तयारी दर्शवली, पण अडचण येत होती त्या आटाचक्कीच्या वजनाची.
10/13

तथापि, या ग्राहकाच्या आग्रहाखातर आणि विमानाने अमेरिकाला आटाचक्की पाठवायची आहे हे लक्षात घेऊन 22 किलो वजनाची आटाचक्कीचे मॉडेल डिझाइन करण्यात आले.
11/13

उंची 2 फूट आणि रुंदी 1 फूट ठेवण्यात आली आणि अर्धा एचपी पॉवरची मोटर बसवण्यात आली.
12/13

ऑर्डर आल्यापासून एक महिन्याच्या आत ही खास आटाचक्की बनवण्यात आली.
13/13

अमेरिकेची खास ओळख असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या चित्राला आटाचक्कीच्या दारावर स्थान दिले.
Published at : 15 Jan 2023 11:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion