एक्स्प्लोर
अजित पवार प्रभू श्रीराम चरणी लीन, विधानसभेआधी देवदर्शनाचा धडाका, पाहा PHOTOS
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेतले.

Ajit Pawar Kalaram Temple Visit
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, गिरीश महाजन यांच्यानंतर अजित पवार यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आहे.
2/7

अजित पवार यांनी पहिल्यांदाच काळाराम मंदिराचे दर्शन घेतल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे.
3/7

महिला, शेतकरी संवाद यांच्या सोबतच अजित पवारांचे देवदर्शन सुरू आहे.
4/7

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांकडून देव दर्शनाचा धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे.
5/7

दिंडोरीमधील मेळावा, सह्याद्री फार्म मध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार श्रीरामाच्या चरणी लीन झाले.
6/7

अजित पवारांनी काळारामाचे दर्शन घेताना सर्वांचं भलं कर अशी प्रार्थना केली.
7/7

अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.
Published at : 08 Aug 2024 05:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion