सानियाशी घटस्फोट पण मुलासोबतच्या नात्याचं काय? शोएब मलिक म्हणाला,...'आम्ही दुबईत'
Sania Mirza and Shoaib Malik : भारताची निवृत्त टेनिसपटू सानिया मिर्झा हिने क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोट घेतल्यानंतर आता मुलाचा सांभाळ कोण करतं?

Sania Mirza and Shoaib Malik : भारतीय दिग्गज माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपूट शोएब मलिक (Shoaib Malik) यांचं नात वर्षभरापूर्वी संपुष्टात आलं. लग्नाच्या 14 वर्षांनंतर शोएब आणि सानियाचा घटस्फोट (Sania Mirza and Shoaib Malik) झाला. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला. दरम्यान, दोघांनी घटस्फोट घेतला असला तरी त्यांचा मुलगा असलेल्या इजहानची जबाबदारी दे दोघंही पाहातात का? मुलाची कस्टडी सध्या सानिया मिर्झाकडे आहे. त्यामुळे शोएब त्याच्या मुलाला भेटतो का? असे अनेक सवाल उपस्थित होत होते. आता शोएब मलिकने याबाबत भाष्य केलंय.
View this post on Instagram
शोएबचा मुलगा त्याला भाई म्हणतो....
नुकताच पार पडलेल्या रमजान शो मध्ये शोएब मलिकने पालक म्हणून निभावत असलेल्या भूमिकेवर भाष्य केलंय. शोएब मलिक म्हणाला, माझं आणि मुलाचं नातं मित्रासारखं आहे. तो मला भाई म्हणतो. कधीकधी मी देखील त्याला भाई म्हणतो. मी महिन्यातून दोन वेळेस त्याला दुबईत भेटायला जातो. दुबईत असलो की आमची भेट होते. मी दुबईत असल्यानंतर स्वत: त्याला शाळेत सोडायला आणि आणायला जातो.
व्हिडीओ कॉलवर होते दोघांची बातचीत ...
माजी क्रिकेटपूट शोएब मलिक पुढे बोलताना म्हणाला, माझं आणि मुलाचं नात फार चांगलं आहे. आम्ही रोज एकमेकांना व्हिडीओ कॉल करतो आणि बोलत असतो, असंही त्यानं स्पष्ट केलं. त्यामुळे सानियाशी घटस्फोट घेतला असला तरी शोएब मलिकने त्याच्या मुलाबरोबरचं नातं जपलय...सोशल मीडियावर शोएब आणि त्याच्या मुलाच्या नात्याची अनेकदा चर्चा झालेला पाहायला मिळते. त्याने या याबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिलं आहे.
सानिया मिर्झाशी घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिकने 20 जानेवारी 2024 रोजी सना जावेद हिच्याशी विवाह केला होता. सना जावेदशी लग्न केल्यानंतर संपूर्ण देशभरात याची चर्चा झाली होती. दरम्यान, घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्या मुलाची काळजी मात्र दोघांकडूनही घेतली जात असल्याचं चित्र आहे. दरम्यान, घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झासह शोएबलाही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

