लखनौ सुपर जाएंटसचा कॅप्टन म्हणून रिषभ पंत नेतृत्त्व करेल. रिषभ पंतला 27 कोटी रुपे मोजून लखनौनं ऑक्शनमध्ये खरेदी केलेलं
पंजाब किंग्जनं देखील यावेळी कॅप्टन बदलला आहे. श्रेयस अय्यरला 26.75 कोटी मोजून पंजाबनं संघात घेतलं आहे. तोसंघाचं नेतृत्व करेल.
सनरायजर्स हैदराबादनं पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वात 17 व्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याला 18 कोटी रुपये मिळतात.
ऋतुराज गायकवाड दुसऱ्यांदा चेन्नईचा कॅप्टन असेल, त्याला 18 कोटी रुपये मिळतात.
राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनला 18 कोटी रुपये मिळतात.
दिल्ली कॅपिटल्सनं अक्षर पटेलची निवड कॅप्टन म्हणून केलीय, त्याला 16.5 कोटी मिळतात.
शुभमन गिल दुसऱ्या हंगामात गुजरात टायटन्सचं नेतृत्त्व करेल. त्याला 16.5 कोटी रुपये मिळतात.
हार्दिक पांड्या दुसऱ्या हंगामात मुंबईचं नेतृत्त्व करेल. त्याला 16.35 कोटी रुपये मिळतात
रजत पाटीदार पहिल्यांदा आरसीबीचं नेतृत्त्व करणार आहे. त्याला 11 कोटी रुपये मिळणार आहेत.
केकेआरनं देखील कॅप्टन बदलला असून अजिंक्य रहाणे हा कॅप्टन असेल, त्याला 1.5 कोटी रुपये मिळणार आहेत.