Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
Aurangzeb Tomb Controversy: शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा रोखठोक प्रश्न

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला कधी धक्का लावला नाही. शिवरायांच्या वंशजांनी अफजल खानाची कबरही हटवली नाही. मग आताच्या काळातील लोकांना या कबरी हटवण्याची इच्छा का होत आहे, असा सवाल खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात फुले विकणाऱ्या विक्रेत्याने उपस्थित केला. या फुलविक्रेत्याने 'एबीपी माझा'शी संवाद साधला.
इक्बाल शेख असे या फुलविक्रेत्याचे नाव आहे. इक्बाल यांच्या अनेक पिढ्यांनी याठिकाणी फुलविक्रीचा व्यवसाय केला आहे. शिवाजी महाराजांनंतरच्या त्यांच्या वंशजांनी कधी औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी काही केले नाही. मग आताच्या लोकांना ही कबर का हटवायची आहे. आपण आपल्या पूर्वजांच्या काही गोष्टी ऐकायला हव्यात. औरंगजेबाची कबर हटवून नेमका कोणाला काय फायदा होणार आहे, हे माझ्या लक्षात येत नाही. औरंगजेबाची कबर हटवून इतिहास बदलणार आहे का? याठिकाणी दरवर्षी परदेशातून लाखो पर्यटक येतात. औरंगजेबाची कबर हटवली तर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होईल, असे या फुलविक्रेत्याने म्हटले.
विश्व हिंदू परिषद - बजरंग दलाकडून औरंगजेबाच्या कबरीविरोधात निषेध आंदोलन
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरु असून भिवंडी शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने औरंगजेब चे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल भिवंडी जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे औरंगजेब च्या कब्र च्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषद,बजरंग दलचे कारेकर्तेनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात " एक धक्का और दो औरंग्या की कबर हटा दो "औरंगजेब विरोधात घोषणाबाजी देत मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकाऱ्याना निवेदन सुपुर्द केले आहे.
औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. बजरंग दलाचे जिल्हा महामंत्री गौतम रावरीया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असून यावेळी बजरंग दलाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी एक निवेदन जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात येणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

