10 कर्णधारांमध्ये सगळ्यात सिनियर, पण सगळ्यात 'गरीब', रहाणेला दीड कोटी, पाटीदार 11 कोटी, टॉपवरील पंतला किती सॅलरी?
IPL Captains Salary : 10 कर्णधारांमध्ये सगळ्यात सिनियर, पण सगळ्यात 'गरीब', रहाणेला दीड कोटी, पाटीदार 11 कोटी, टॉपवरील पंतला किती सॅलरी?

IPL Captains Salary : आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या दृष्टीने सर्व 10 च्या 10 संघानी तयारी सुरु केली आहे. खेळाडू आपआपल्या संघाशी जोडले जात असून प्रॅक्टीस सुरु करण्यात आली आहे. या हंगामातील पहिला सामना 22 मार्च रोजी कोलकातामधील ईडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात केकेआर आणि आरसीबी दरम्यान असणार आहे. दरम्यान, आता आयपीएलमधील सर्व 10 संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे.
या हंगमात पाच संघांना नवे कर्णधार मिळाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलवर कर्णधारपदाची धुरा सोपवलीये. केकेआरने अजिंक्य राहणेच्या नेतृत्वावर विश्वास टाकलाय. याशिवाय आरसीबीने रजत पाटीलकडे कर्णधारपद दिलंय. पंजाबने श्रेयस अय्यर तर लखनौने ऋषभ पंतला कर्णधार म्हणून निवडलंय.
IPL 2025 captain's salary:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2025
Rishabh Pant - 27cr.
Shreyas Iyer - 26.75cr.
Pat Cummins - 18cr.
Ruturaj Gaikwad - 18cr.
Sanju Samson - 18cr.
Axar Patel - 16.5cr
Shubman Gill - 16.5cr.
Hardik Pandya - 16.35cr.
Rajat Patidar - 11cr.
Ajinkya Rahane - 1.5cr. pic.twitter.com/hO5IsCrGhn
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक संघांना नव्या कर्णधाराची गरज होती. कारण त्यांनी आपल्या जुन्या कर्णधारांना रिलीज केले होते. त्यामुळे नवे कर्णधार मिळवण्यासाठी संघांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे प्रत्येक कर्णधाराची सॅलरी सध्या चर्चेचा विषय ठरलीये. कोणत्या कर्णधाराला किती सॅलरी मिळाली? जाणून घेऊयात...
ऋषभ पंत आयपीएल 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मेगा लिलावात लखनौने त्याला 27 कोटी रुपयांना खरेदी केले. पंजाबलाही नवीन कर्णधाराची गरज होती, त्यामुळे त्यांनी श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. या मोसमात अजिंक्य रहाणे सर्वात स्वस्त कर्णधार ठरलाय आहे. कारण केकेआरने त्याला दीड कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
आयपीएलमधील 10 कर्णधारांची सॅलरी
ऋषभ पंत (LSG) - 27 कोटी
श्रेयस अय्यर (PBKS) - 26.75 कोटी
पैट कमिंस (SRH)- 18 कोटी
ऋतुराज गायकवाड (SCK)- 18 कोटी
संजू सैमसन (RR)- 18 कोटी
अक्षर पटेल (DC)- 16.5 कोटी
शुभमन गिल (GT)- 16.5 कोटी
हार्दिक पांड्या (MI)- 16.35 कोटी
रजत पाटीदार (RCB)- 11 कोटी
अजिंक्य रहाणे (KKR)- 1.5 कोटी
मोठी नाव संघात, पण कर्णधारपद त्यांच्याकडे नसणार
या कर्णधारांच्या यादीत पॅट कमिंस तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॅट कमिन्सला 2025 च्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादने 18 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या मोसमात अंतिम फेरी गाठली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी आता कर्णधार म्हणून दिसणार नाहीत. मात्र, ते संघात मार्गदर्शन करत चांगली खेळी करताना दिसतील, असं बोललं जातंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

