'मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम..'; गुलिगत स्टार सूरजच्या 'झापुक झुपूक'चा टीझर रिलीज
Zapuk Zupuk Marathi Movie Official Teaser Suraj Chavan: सोशल मीडिया स्टार आणि 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय.

Zapuk Zupuk Marathi Movie Official Teaser Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavhan) रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमाचा टीझर (Zapuk Zupuk Marathi Movie) रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) सूरज चव्हाण (Suraj Chavan) मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
बिग बॉस मराठी सीझन 5 च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणनं आपलं नाव कोरलं. आपल्या साधेपणानं सूरजनं अख्ख्या महाराष्ट्राला आपलंस केलं. लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' या त्याच्या पहिल्या मराठी सिनेमात दिसणार आहे. त्याच्या याच सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती बेला केदार शिंदे, केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.
सूरज चव्हाण आपल्या डायलॉग्ससाठी प्रसिद्ध आहे. "मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे", असाच काहीसा सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाचा टीझर आहे. दमदार टीझरमध्ये 'झापुक झुपूक' सिनेमाची झलक पाहायला मिळते. सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल्ल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार आहे. हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरज ने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली. त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे. एका ग्रामीण भागातील हा मुलगा त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आहे, मराठी मातीतल्या या साध्या भोळ्या सूरजसाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे.
सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे 'झापुक झुपूक' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच सूरज 'झापुक झुपूक' सिनेमाचं पोस्टर घेऊन जेजुरीला गेला होता. तिथे सिनेमाचं पोस्टर सूरज चव्हाणनं खंडेरायाच्या चरणावर ठेवलं आणि त्याला साकडं घातलं. त्यासोबतच सूरजनं आईमरी मातेचं आणि मोरगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेत सिनेमाच्या प्रमोशनची जोरदार सुरुवात केली.
दरम्यान, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमा येत्या 25 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा टीझर :
























