एक्स्प्लोर
Maharashtra Weather Update: तापमानात दिलासा तरी रखरख कायम; आज कुठे किती तापमान? कुठे पावसाचे अलर्ट? IMD चा इशारा, Photos
राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका दुसरीकडे ढगाळ हवामान आणि पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. कुठे कसे राहणार हवामान? पहा
Maharashtra Weather Upate
1/9

राज्यात उन्हाने चाळिशीचा पारा गाठलाय .त्यामुळे प्रचंड रखरख वाढली आहे . एकीकडे उष्णतेच्या लाटा तर आता पावसाचे अलर्ट देण्यात आल्याने नागरिक हैराण झाले आहेत .
2/9

गेल्या दोन दिवसांपेक्षा आज कमाल तापमान 2-3 अंशांनी कमी झाले आहे .मात्र अजूनही 38 ते 40 दरम्यानच तापमान नोंदवले जात आहे .
3/9

दरम्यान किमान तापमानाच्या पाऱ्यात काहीशी वाढ झाल्याचे हवामान विभागाने नोंदवले .कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सकाळचा प्रहरही उष्णच असल्याचे दिसते .
4/9

कमाल तापमानात काहीसा दिलासा वाटत असला तरी सकाळपासूनच उष्ण झळा बसत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे .
5/9

दरम्यान मराठवाड्यात आज पासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे .त्यामुळे किमान व कमाल दोन्ही तापमान सामान्य आहे .
6/9

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार 21, 22 मार्चला मराठवाडा आणि विदर्भात तर 23 मार्चला विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे .
7/9

शनिवार आणि रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे .
8/9

दरम्यान आज 19 मार्चला पुण्यात किमान तापमानात वाढ झाली आहे .गेल्या काही दिवसांपासून सकाळी उष्णता अधिक जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे .
9/9

अनेक भागात पावसामुळे ढगाळ वातावरण असून मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे .
Published at : 19 Mar 2025 01:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























