एक्स्प्लोर
India: देशातील या आठवडाभरातील महत्त्वाच्या घडामोडी; पाहा फोटोंमधून
India This Week: गेल्या आठवड्यात देशाभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या आठवडाभरातील घटनांचा फोटोंच्या माध्यमातून आढावा घेऊया.
India This Week
1/10

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (11 सप्टेंबर) हैदराबाद हाऊसमध्ये सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स सलमान यांची भेट घेतली आणि राष्ट्रपती भवनात प्रिन्स सलमान यांचं स्वागत करण्यात आलं.
2/10

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (11 सप्टेंबर) यूके-इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिजचं लोकार्पण केले. यावेळी ब्रिटनचे अर्थमंत्री जेरेमी हंटही उपस्थित होते.
3/10

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हिमाचल दौऱ्यावर असताना मंगळवारी (12 सप्टेंबर) कुल्लू, मनाली आणि मंडी येथील आपत्तीग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक नेतेही उपस्थित होते.
4/10

कोलकात्यात मुसळधार पावसानंतर बुधवारी (12 सप्टेंबर) अनेक ठिकाणी पाणी साचलं, त्यानंतर लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं.
5/10

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांची मंगळवारी (12 सप्टेंबर) मुंबईत बैठक झाली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही बैठक झाली.
6/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) मध्य प्रदेशातील बिना येथे रिमोटचं बटण दाबून 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली.
7/10

मंगळवारी (12 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केलं, यावेळी एक जवानही शहीद झाले.
8/10

गुरुवारी (14 सप्टेंबर) गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर रोडवेजची बस सुमारे 12 फूट दरीत घसरली. या घटनेत 20 प्रवासी जखमी झाले.
9/10

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात शुक्रवारी (15 सप्टेंबर) दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरूच होती.
10/10

काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत दोन शहीद जवानांना शुक्रवारी (15 सप्टेंबर) साश्रूनयनांनी अंतिम निरोप देण्यात आला.
Published at : 16 Sep 2023 02:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
