एक्स्प्लोर
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
'चिल्लई कलान' हा पर्शियन शब्द आहे. ज्यात 'चिला' म्हणजे स्वतःला घरात बंदिस्त करणे.

Kashmir Winter
1/9

तापमानात होणारी लक्षणीय घट,प्रचंड हिमवृष्टी, कडाक्याची थंडी. काश्मीर खोऱ्यातली गारठा भल्याभल्यांना भुरळ पाडणाराय.
2/9

काश्मीर खोऱ्यात सध्या देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद होतेय. 30 डिसेंबर 2024 रोजी खोऱ्यात तापमानात उणे 8.5 अंशांपर्यंत घसरण झाली, जी गेल्या पाच दशकांतील सर्वात थंड हिवाळ्याची रात्र होती.
3/9

तापमानाच्या या घसरणीला चिल्लई कलान असा शब्द आहे. हा काश्मीर खोऱ्यातला 40 दिवसांचा तीव्र थंडीचा काळ समजला जातो.
4/9

21 डिसेंबरपासून सुरु झालेला हा काळ जानेवारी 29 पर्यंत संपण्याची शक्यता आहे.
5/9

उत्तर भारतात जम्मू काश्मीर वगळता इतरत्र थंडीची लाट थोडी कमी झाली असली तरी काश्मीर खोऱ्यात मात्र हिमवृष्टीमुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
6/9

विशेषत: गुलमर्ग आणि पहलगाममध्ये हा कडाका प्रचंड असून तापमानाचा पारा उणे ९.० अंशांपर्यत उतरला आहे.
7/9

दक्षिण काश्मीर गोठलेलेच असून पहलगाममध्ये किमान तापमान शुन्याखाली ८ .५ अंशावर आहे.
8/9

गुलमर्गच्या स्की रिसॉर्टमध्ये -10.0 डिग्री सेल्सियस, त्यानंतर सोनमर्ग -9.9 डिग्री सेल्सियस आणि पहलगाममध्ये -9.2 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. "श्रीनगरमध्ये, किमान तापमान -0.9 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले
9/9

चिल्लई कलान दरम्यान लोक पारंपारिक 'फेरान' घालतात. हा एक लांब लोकरीचा झगा आहे जो तीव्र हिवाळ्यात उबदारपणा देतो.
Published at : 31 Dec 2024 09:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
चंद्रपूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion