Kuldeep Yadav Profile : कुलदीप यादव : रोहितसेनेच्या भात्यातील हुकुमी अस्त्र; भल्याभल्यांची फिरकी घेणारा डावखुरा गोलंदाज
Kuldeep Yadav Profile : आपल्या जादुई फिरकिनं साऱ्यांना गारद करणाऱ्या कुलदीप यादवची क्रिकेट विश्वातील कारकीर्द वादळी असली तरी त्यानं अनेक संकटांवर मात करत स्वत:ला सिद्ध केलंय.

Kuldeep Yadav Profile Champions Trophy 2025 : भारतीय संघातील कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भात्यातील हुकुमी अस्त्र, म्हणजेच डावखुरा गोलंदाज कुलदीप यादव हा होय. समुद्राच्या खोलीचा, आकाशाच्या उंचीचा जसा अन् कैलास पर्वताचा अंदाज जसा बांधता येत नाही, तसं कुलदीपने टाकलेला चेंडू, कशी कुणाची फिरकी घेईल याचा अंदाज भल्या भल्यांना बांधता आलेला नाही. कुलदीप यादव बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग नव्हता. पण त्याने अनेक अडथळ्यांची मालिका पार करत अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत (Champions Trophy 2025) आपली दमदार एंट्री केलीच. शिवाय त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ही टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसलाय. एखाद्या गुणी मुलाला काम सांगावं आणि ते नम्रपणे करावं, तसं कुलदीप भल्याभल्यांची विकेट घेऊन जातो. आपल्या जादुई फिरकिनं साऱ्यांना गारद करणाऱ्या कुलदीप यादवची क्रिकेट विश्वातील कारकीर्द वादळी असली तरी त्यानं अनेक संकटांवर मात करत स्वत:ला सिद्ध केलंय.
फिरकीची धुरा एकहाती सांभाळणारा डावखुरा गोलंदाज
देशासह जागाचे लक्ष लागून राहिलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy 2025) अंतिम सामना आज (9 मार्च) खेळाला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ दुबईमध्ये आमनेसामने येणार आहेत. या मेगा इव्हेंटच्या विजेतेपदाच्या सामन्यात दोन वेळची चॅम्पियन टीम इंडिया आणि एक वेळची चॅम्पियन न्यूझीलंड यांच्यात एक रोमांचक सामना रंगणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला तब्बल 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. निश्चितच तमाम देशवासीयांच्या नजरा या सामान्याकडे लागून राहिल्या आहे. अशातच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (India vs New Zealand) या अंतिम सामन्यात गोलंदाजाची महत्वाची भूमिका असणार आहे.
दरम्यान, फिटनेसच्या कारणाने गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग नसलेला आणि टीम इंडियाच्या फिरकीची धुरा एकहाती सांभाळणारा कुलदीप यादववर देखील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाची धुरा राहणार आहे. डावखुरा कुलदीप यादव हा रोहित शर्माच्या भात्यातील हुकुमी अस्त्र आहे. त्यामुळे कुलदीप यादव न्यूझीलंड संघाला आपल्या फिरकीनं कसा गारद करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अनेक अडथळ्यांची मालिका, पण ध्येयाचा पाठलाग कायम
कुलदीप यादव बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग नाही. पण त्याने अनेक अडथळ्यांची मालिका पार करत अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आपली दमदार एंट्री केलीच. शिवाय तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ही टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. खरंतर या आधीच कुलदीप यादवने फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केलीय. यापूर्वी, कुलदीप यादवची फिटनेस टेस्ट 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये घेण्यात आली होती. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गेल्या पाकिस्तान विरोधातील सामन्यात भारताकडून कुलदीपने सर्वाधिक 3 आणि हार्दिक पंड्याने 2 विकेट घेतल्या होत्या. अशातच न्यूझीलंड विरोधातील सामन्यात कुलदीप यादव आपली किमया कायम ठेवेल ही साऱ्यांना अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.
अंडर-19 विश्वचषकात सर्वाधिक बळी, हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय (Kuldeep Yadav internation career)
वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या जादुई फिरकीची धुरा एकहाती सांभाळणारा विनम्र सैनिक म्हणजे डावखुरा कुलदीप यादव हा होय. क्रिकेट विश्वास कुलदीपची 2014 मध्ये उत्तर प्रदेशच्या अंडर-19 संघात निवड झाली. त्याने 31 मार्च 2014 रोजी विदर्भाविरुद्ध पहिला सामना खेळला. यानंतर, 22 ऑक्टोबर 2014 रोजी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला. तो 2014 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आणि स्पर्धेच्या इतिहासात हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याचा मानही त्याने मिळवला. 2016 च्या दिलीप ट्रॉफीमध्ये कुलदीपने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या तीन सामन्यांत त्याने 17 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली.
कुलदीप यादवची आयपीएल कारकीर्द :(Kuldeep Yadav IPL career)
कुलदीप यादवने आयपीएल विश्वातील कारकिर्दीत अनेक चढ उतार पहिले. मात्र आपल्या मेहनत आणि सातत्यावर त्याने स्वत:ला वेळोवेळी सिद्ध केलंय. 2012 च्या आयपीएल हंगामात कुलदीप यादवला मुंबई इंडियन्सने 10 लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र, त्या सीझनमध्ये त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर दोन वर्षांनी 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 40 लाख रुपयांना विकत घेतले. पण, त्यातही तो एकही सामना खेळू शकला नाही. शेवटी KKR ने कुलदीपला 2016 IPL मध्ये खेळण्याची संधी दिली. यावेळी मात्र कुलदीपने कुणाला निराश केले नाही. त्याने 3 सामन्यांत 6 विकेट घेतल्या. 2017 मध्ये KKR ने कुलदीपला आपल्या संघात कायम ठेवले आणि 12 सामन्यांत 12 विकेट घेत कुलदीपने संघात आपलं स्थान टिकवून ठेवलं.
2018 मध्ये KKR संघात खेळताना सीझनमध्ये त्याने पहिला सामनावीर पुरस्कारही जिंकला. मात्र, 2019 च्या आयपीएल हंगामात त्याची फारशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. 2020 चा आयपीएल हा त्याचा सर्वात वाईट परफॉर्मिंग सीझन होता. चार सामन्यांत केवळ 1 बळी घेतल्यानंतर त्याला KKRच्या प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले. 2021 च्या हंगामातही तो फक्त काही सामने खेळू शकला आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला. मात्र, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने कुलदीपला 2 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने त्या हंगामात 14 सामन्यांत 21 विकेट घेत शानदार पुनरागमन केले. 2023 च्या आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला कायम ठेवले होते. मात्र, त्याची कामगिरी काही विशेष नव्हती.
कुलदीप यादव अनेक पराक्रमांचा मानकरी (Kuldeep Yadav Record) :
2014 च्या ICC अंडर-19 विश्वचषकात कुलदीप यादवने स्कॉटलंडविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. या हॅट्रिकसह कुलदीप यादव अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. 2016 मध्ये, कुलदीप यादवने दुलीप ट्रॉफीमध्ये केवळ तीन सामन्यांमध्ये विक्रमी 17 बळी घेतले होते. कपिल देव आणि चेतन शर्मा यांच्यानंतर, कुलदीप यादव वनडे फॉरमॅटमध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप हा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. कुलदीपने इंग्लंडविरुद्धच्या T20 सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता, ज्यासह तो T20I मध्ये पाच विकेट घेणारा युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरला. 12 जुलै 2018 रोजी कुलदीपने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट घेत नवीन विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच, कसोटी फॉरमॅटमध्ये चार विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे.
संबंधित बातम्या























